20 C
Latur
Tuesday, November 5, 2024
Homeलातूरजळकोट तालुक्यात तंटामुक्त गाव मोहीम नाममात्र

जळकोट तालुक्यात तंटामुक्त गाव मोहीम नाममात्र

जळकोट : प्रतिनिधी
मागील काही वर्षामध्ये महत्वाची भुमिका बजावणा-या तंटामुक्त गाव मोहिमेला जळकोट तालुक्यामध्ये कमालीची घरघर लागली आहे. या समित्या नाममात्र राहिल्याने गावातील तंटे आता पोलीस ठाण्यापर्यंत जात असून सणोत्सवाच्या काळात गावागावात पोलिसांचा पहारा लागत आहे. त्यामुळे शासनाची ही महत्वाकांक्षी योजना केवळ कागदोपत्रीच राबविल्या जात असल्याचे चित्र दिसून येत आहे.
शांततेतून  समृध्दीकडे नेणा-या महात्मा गांधी तंटामुक्त गाव समित्यांची दिवंगत गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्या संकल्पनेतून १५ ऑगस्ट २००७ साली स्थापना करण्यात आल्या. तालुका प्रशासन, पोलीस प्रशासन, पोलीस पाटील, गावातील सरपंच, गावामधून निवडण्यात आलेले तंटामुक्त समितीचे अध्यक्ष यांच्या माध्यमातून गावातील वाद, तंटे गावातच सोडविण्याची तरतूद या मध्ये आहे.  वाद गावातच मिटत असल्यामुळे  महात्मा गांधी तंटामुक्त गाव अल्पावधीतच लोकप्रिय ठरली. आणखी विशेष बाब म्हणजे तंटामुक्त गावांसाठी पुरस्कार घोषित केल्याने गावातील नागरिक एकोप्याने राहू लागले. नागरिकांच्या एकजुटीमुळे गावागावा शांतता निर्माण व्हायला लागली. चांगली काम केल्याने अनेक पुरस्कारही मिळाले. पुरस्काराच्या रकमेतून गावात विकास कामे केल्या गेल्याने गावक-यांमध्ये उत्साह संचारला आहे.
जळकोट तालुक्यात गेल्या काही वर्षापासुन या मोहिमेचा प्रभाव कमी होत जाऊन कोरोना काळापासून ही मोहीम अधिकच थंडावली आहे. याची वेगवेगळी कारणे सांगीतली जात असली तरी योजनेकाडे शासन, प्रशासनाचे दुर्लक्ष प्रमुख कारण मानले जात आहे. संबंधित विभागाकडून या मोहिमेची जनजागृती व्हावी अशी अपेक्षा असताना आता तेही होत नाही.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR