22.4 C
Latur
Monday, September 16, 2024
Homeलातूरजळकोट तालुक्यात तलावावरील मोटारी जप्तीची मोहीम

जळकोट तालुक्यात तलावावरील मोटारी जप्तीची मोहीम

जळकोट : प्रतिनिधी
जळकोट तालुक्यामध्ये यावर्षी खूप कमी पाऊस झालेला आहे यामुळे पाणीसाठा साठवण तलाव तसेच इतर स्त्रोतांमध्ये पाणीसाठा झाला नाही. यामुळे आगामी मार्च एप्रिल व मे महिन्यात जळकोट तालुक्यात भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे . अशा स्थितीत प्रशासनाने सर्व साठवण तलावांमधील पाणी पिण्यासाठी आरक्षित केले होते  परंतु काही शेतक-यांनी महसूल प्रशासनाचे आदेश न जुमानता मोटारी सुरू ठेवून शेतीला पाणी देणे चालूच ठेवले होते. ढोरसांगवी साठवण तलाव तसेच चेरा साठवण तलाव या ठिकाणी अचानक महसूल विभागाच्या पथकाने पाहणी करुन सात ते आठ विद्युत मोटारी जप्त केल्या आहेत .
जळकोट तालुक्यामध्ये १४ साठवण तलाव आहेत, यापैकी दहा साठवंतलावातील पाण्याची स्थिती अतिशयचिंताजनक आहे . जळकोट मंडळामध्ये तर पाऊसच पडला नाही यामुळे साठवण तलावामध्ये नवीन पाणीसाठा जमलेला नव्हता . असे असले तरी शेतकरी आपल्या शेतातील ऊस तसेच इतर रब्बी पिके वाचवण्याचा प्रयत्न करण्यासाठी साठवण तलावांमधील पाणीसाठा उपसत होते . शेतीला पाण्यासोबतच नागरिकांना तसेच जनावरांना पण्यिासाठी पाणी मिळणेही महत्त्वाचे आहे . माणसांना पिण्यास पाणी मिळाले नाही तर अवघड स्थिती निर्माण होईल , या दृष्टिकोनातून महसूल विभागाने यापूर्वीच नियोजन केलेले होते. अनेक शेतक-यांनी आपल्या विद्युत मोटारी काढून घेतल्या तर बहुतांश शेतक-याांंनी तलावामध्ये पाणी नसल्यामुळे नवीन ऊस लागवड बंद केली तर ज्या शेतक-यांचा खोडवा ऊस होता त्या शेतक-यांनी आपला ऊस मोडला .
जळकोटच्या तहसीलदार सुरेखा स्वामी यांनी अनेक तलावांमधील पाणी पिण्यासाठी आरक्षित केले होते. यामुळे बहुतांश शेतक-याांनी आपल्या विद्युत मोटारी काढून घेतल्या होत्या. जळकोट तालुक्यातील ढोरसांगवी आणि चेरा या तलावावर व्द्यििुत मोटारी सुरू आहेत अशी माहिती महसूल विभागाने मिळाली. तहसीलदार सुरेखा स्वामी यांच्या आदेशाने मंडळ अधिकारी कमलाकर पन्हाळे ,  तलाठी स्वप्नील बेंबडे , तलाठी धुपे  वश्विास , सूर्यवंशी यांच्या पथकाने तळावर सुरू असलेल्या आठ विद्युत मोटारी जप्त केल्या.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR