23 C
Latur
Friday, September 20, 2024
Homeलातूरजळकोट तालुक्यात हरणांचा हैदोस

जळकोट तालुक्यात हरणांचा हैदोस

जळकोट :  प्रतिनिधी
जळकोट तालुक्यातील शेतक-यांच्या मागील संकट काही कमी होण्यास तयार नाही, एक संक ट कमी झाले म्हणले तर लागलीच पुढे दुसरे संकट उभे टाकत आहे. यामुळे तालुक्यातील शेतकरी मेटाकुटीस आला असून शेतक-या पुढचे दुबार पेरणीचे संकट दूर झाले म्हंटले तर आता पेरलेले उगवले परंतु हे उगवलेले पीक शेकडोंच्या संख्येने हरीण फस्त करत आहेत. यामुळे शेतक-यांपुढे हरणाच्या रूपाने नवीनच संकट ओढवले आहे.
  जळकोट तालुक्यातील शेतकरी हे पूर्णपणे खरीप हंगामावर अवलंबून असतात, या हंगामात चांगला पाऊस झाला आणि चांगली पीके आली तर शेतकरी चांगल्या पद्धतीने जीवन जगू शकतो. परंतु गत तीन ते चार वर्षापासून शेतक-यांना कधी अवर्षण तर कधी अति पाऊस यामुळे शेतीमधील उत्पन्न अतिशय कमी मिळत आहे. यामुळे सद्यस्थितीत तालुक्यातील शेतकरी अतिशय आर्थिक संकटात सापडला आहे.
  या वर्षीचा खरीप हंगाम तरी चांगल्या पद्धतीने होईल अशी अपेक्षा शेतक-यांना होती परंतु ती पण आता फोल ठरली आहे. कारण शेतक-यांनी जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये  चांगला पाऊस झाल्यामुळे पेरण्या आटोपुन घेतल्या. तालुक्यामध्ये जुलैच्या पहिल्या आठवड्यामध्ये पावसाने उघडीत दिली होती यामुळे पिकांच्या वाढीवर याचा परिणाम झाला होता. अनेक शेतक-यांना दुबार पेरणी करावी लागली तर अनेक शेतक-यांना कापसाची दुस-यांदा लागवड करावी लागली. यामुळे शेतकरी अगोदरच आर्थिक संकटात आहे.
जळकोट तालुक्यातील शेतक-यांनी कशी बसी पेरणी केली यानंतर ब-यापैकी पाऊस झाला यामुळे पिकांची उगवण झाली परंतु वन्यजीव प्राण्यांमुळे शेतकरी आता मेटाकुटीस आला आहे. शेतक-यांच्या शेतामध्ये शेकडोच्या हरणाचा कळप एका वेळीच दाखल होत आहे. तसेच शेतामधील पीक खाऊन फस्त करत आहे. या हरणांना राखण्याची वेळ शेतक-यांवर आली आहे. अनेक शेतक-यांनी आपल्या शेतामध्ये बुजगावणे उभारली आहेत परंतु या बुजगावण्याला देखील हरीण भीत नाहीत. शेतक-यांंना स्वत:हा सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत आपले पीक हरणा पासून वाचवावे लागत आहे. तसेच हरणा व्यतिरिक्त रान डुकरे, वानर, मोर, याचाही त्रास मोठ्या प्रमाणात शेतक-यांना होत आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR