22.4 C
Latur
Monday, September 16, 2024
Homeलातूरजळकोट तालुक्यात १ हजार मेट्रिक टन खत उपलब्ध

जळकोट तालुक्यात १ हजार मेट्रिक टन खत उपलब्ध

जळकोट : ओमकार सोनटक्के
जळकोट तालुक्यात सध्या पेरणीपूर्व मशागतीची कामे जोरात सुरू आहे अनेक प्रगतिशील शेतकरी मशागत अंतिम टप्प्यात आली आहे. मान्सून हा जूनच्या पहिल्या आठवड्यातकिंवा दुस-या आठवड्यात केव्हाही मराठवाड्यात दाखल होऊ शकतो. यावर्षी जळकोट तालुक्यासाठी ४९३२ मेट्रिक टन खत लागणार आहे. सध्या बाजारामध्ये १४४२  मेट्रिक टन खत उपलब्ध आहे .
   जळकोट तालुक्यातील कृषी दुकानांमध्ये युरिआ – ५१८ मे .टन, डिएपी- १८१ मे. टन , एसएसपी- १३३ मे . टन , एमओपी- ९.२५ मे. टन, एन . पी . के ५९८ मे. टन,  असे एकूण १४४२  मेट्रिक टन खत जळकोटच्या बाजारात उपलब्ध आहे. तर जळकोट तालुक्यासाठी युरीया- ९६८, डिएपी- ९६८, एमओ पी- ९२, इतर संयुक्त खते-२१५२, एस एस. पी. -७५२ अशा एकूण ४९३२  मॅट्रिक टन खताची मागणी करण्यात आली आहे  परंतु सध्या मार्केटमध्ये १४४२ मेट्रिक टन एवढाच खत उपलब्ध आहे.  याशिवाय आणखीन बरेच खते बाजारात येण्याची शक्यता असल्याची माहिती पंचायत समिती कृषी विकास अधिकारी सुडे यांनी दिली. जळकोट तालुक्यात शहरी भागात व ग्रामीण भागात  अशी ३६ परवानाधारक कृषी निविष्ठा दुकाने आहेत .
जळकोट तालुक्यात दरवर्षी जवळपास बावीस हजार हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनची पेरणी करण्यात येते . तालुक्याला बाराशे टन सोयाबीन बियाणे लागते . एवढे बियाणे बाजारपेठेत उपलब्ध होत नाहीत. यावर्षी जळकोट तालुक्यातील कांही शेतकरी हे पेरणीसाठी घरचे बियाणे वापरण्याची शक्यता वर्तवली जात आहे . घरच्या बियाणाची पेरणी करताना करताना शेतक-यानी उगवण क्षमता तपासून पहावी. बियाण्याची उगवण क्षमता  चांगली असेल तरच पेरनीसाठी बियाने वापरावे, तसेच बीजप्रक्रिया करूनच पेरणी करावी असे आवाहन  तालुका कृषी अधिकारी आकाश पवार व पंचायत समितीचे कृषी विकास अधिकारी सुडे यांनी केले आहे .

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR