28.8 C
Latur
Thursday, March 13, 2025
Homeलातूरजळकोट तालुक्यात ३५० ग्राहकांची वीज केली खंडित

जळकोट तालुक्यात ३५० ग्राहकांची वीज केली खंडित

जळकोट : प्रतिनिधी
जळकोट महावितरणच्या उपअभियंता कार्यांलया अंतर्गत येणा-या तीन शाखा अभियंता कार्यालय अंतर्गत गावामध्ये सध्या थकबाकीदार वीज ग्राहकाकडून वीज वसुलीची मोहीम सुरू झालेली आहे . ज्या ग्राहकांना वेळोवेळी सूचना देऊनही वीज बिल भरले नाही अशा तब्बल साडेतीनशे ग्राहकांची बत्ती गुल झाली आहे . म्हणजेच महावितरण ने त्यांचा वीज पुरवठा खंडित केला आहे . आपलाही वीजपुरवठा खंडित होऊ नये यासाठी ग्राहकांनी आपले वीज बिल भरणे गरजेचे आहे .
जळकोट येथील महावितरणच्या उपअभियंता कार्यालय अंतर्गत घरगुती , व्यावसायिक तसेच उद्योग या सर्वांची मिळून दोन कोटी चोपन्न लाख रुपयाची थकबाकी आहे . जळकोट येथील शाखा अभियंता कार्यालय अंतर्गत ५५२० ग्राहकांकडे ८७ लाख रुपयांची थकबाकी आहे तर नळगीर येथील शाखा अभियंता कार्यालय अंतर्गत ५८०० ग्राहकाकडे ८० लाख रुपयांची थकबाकी आहे. यासोबतच हाडोळती येथील ५९०० ग्राहकाकडे ८७ रुपयाची थकबाकी आहे . सर्व शाखा अभियंता कार्यालय अंतर्गत प्रत्येक गावामध्ये वसुलीची मोहीम जोरात सुरू आहे . ज्या ग्राहकांनी विज बिल भरले नाही , तसेच ते अनेक महिन्यापासून थकबाकीदार आहेत अशांचे वीज कनेक्शन तोडले जात आहेत .
जळकोट येथील महावितरणच्या उपअभियंता कार्यालय अंतर्गत आत्तापर्यंत तब्बल ४१ लाख रुपयाची वसुली करण्यात आली आहे . थकीत बिल असलेल्या वीज ग्राहकांनी तात्काळ आपले वीज बिल भरून घ्यावे असे आवाहन महावितरणचे उपविभागीय अभियंता महेश वाघमारे , शाखा अभियंता दिलीप भोसले , अमोल सूर्यवंशी , राम बिरादार , यांनी केले आहे . वेळेमध्ये वीज बिलाचा भरणा न केल्यास तात्काळ आपले वीज कनेक्शन कट करण्यात येईल यामुळे विना विलंब आपली थकबाकी महावितरणच्या कार्यालयामध्ये अथवा ऑनलाईन पद्धतीने , तसेच मान्यता प्राप्त भरणा केंद्रावर भरून घ्यावी असे आवाहन देखील उपविभागीय अभियंता महेश वाघमारे यांनी केले आहे .

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR