36.3 C
Latur
Saturday, May 3, 2025
Homeलातूरजळकोट पंचायतसमोर कामगार सेनेचे कामबंद आंदोलन

जळकोट पंचायतसमोर कामगार सेनेचे कामबंद आंदोलन

जळकोट : प्रतिनिधी
राज्यातील ग्रामपंचायत कर्मचा-यांच्या विविध मागण्यांसाठी वेतनश्रेणी, निवृत्ती वेतन / ग्रॅज्युटी व वसुलीची / उत्पनाची जाचक अट रद्द करणे तसेच इतर मागण्यासाठी कामगार दिनी दि. १ मे २०२५ पासून ते  २ मे २०२५ हे दोन दिवस जळकोट तालुक्यातील सर्व ग्रा.प. कर्मचारी  यांच्यावतीने जळकोट पंचायत समितीसमोर काम बंद आंदोलन करण्यात आले .
  राज्यातील २७९२० ग्रामपंचायतीमध्ये सफाई कामगार, पाणीपुरवठा कामगार, वीजपुरवठा कामगार कर वसुली कर्मचारी लिपिक ई. पदावर सेवेत आहेत. सुमारे ६०००० ग्रा.प. कर्मचारी अत्यल्प वेतनात काम करीत आहेत.  कर्मचा-यांचे वेतनाचा प्रश्न अनेक वर्षापासून प्रलंबित आहेत याबाबत ग्रा.प. कर्मचा-यांनी अनेकदा आंदोलन मेळावे, मोर्चे, अधिवेशन केले आहेत.  मुख्यमंत्री , ग्रामविकासमंत्री व कामगार मंत्री व बरेचशे आमदार आंदोलनात मोर्चास व आधिवेशानास उपस्थित राहून मार्गदर्शन केले व आश्वासन दिले होते.  अनेकदा प्रशासकीय बैठका झाल्या. मात्र ग्रा.प. कर्मचा-यांच्या मागण्यासबंधी अद्यापही निर्णय झाला नाही. या मुळे राज्यातील ग्रा.प. कर्मचारी यांच्यात नाराजी पसरली आहे. कामगार दिनी आंदोलनाबाबतचे निवेदन सेनेच्या वतीने देण्यात आले होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR