25.6 C
Latur
Wednesday, July 3, 2024
Homeलातूरजळकोट येथे महाविकास आघाडीच्या वतीने ठिय्या

जळकोट येथे महाविकास आघाडीच्या वतीने ठिय्या

जळकोट : प्रतिनिधी
जळकोट तालुक्यातील शेतकरी गत तीन ते चार वर्षांपासून कधी आवर्षण तर कधी अतिवृष्टी यामुळे आर्थिक  संकटात सापडला आहे.  तालुक्यातील शेतक-यांना उभारी देण्यासाठी जळकोट तालुक्यात दुष्काळ जाहीर करावा तसेच तालुक्यातील सर्व शेतक-यांंना पिक विमा मंजूर करुन सरसकट कर्ज माफ करावे, अशी मागणी जळकोट तालुका महाविकास आघाडीच्या वतीने करण्यात आली आहे. काँग्रेसचे नेते मन्मथ किडे यांच्या नेतृत्वाखाली तालुक्यातील शेतक-यांंच्या विविध मागण्यांसाठी जळकोट तहसील समोर सोमवारी ठिय्या आंदोलन करण्यात आले .
   जळकोट तालुका दुष्काळ जाहीर करावा , सर्व शेतक-यांना सरसकट कर्ज माफी करण्यात यावी, तीन वर्षांपासून न मिळालेला पीक विमा वाटप करावा, चालूवर्षी शेतक-यांंना दुबार पेरणीसाठी खते-बियाणे मोफत द्यावे, जळकोट डोंगरी तालुका म्हणून जाहीर करावा, उदगीर-जळकोट महामार्गावरील तेरू नदीवरील पुलाचे काम त्वरित पूर्ण करावे व तोपर्यंत जुना रस्ता पर्यायी मार्ग म्हणून डांबरीकरण करून रहदारीसाठी सोय करून द्यावी,  महावितरण कंपनीच्या वतीने शेतक-यांना व गावक-याना विद्युत पुरवठा सतत करण्यात यावा, सन २०२३-२४ ला दुष्काळ जाहीर करून दुष्काळी अनुदान देण्यात आले नाही ते देण्यात यावे, शेतक-यांचे व शेतमजुराचे राशन धान्य वाटप बंद केले असून ते सुरू करण्यात यावे. आदी मागण्यांचे निवेदन जळकोट तहसीलदारना सादर करण्यात आले.
यावेळी ‘मारोती पांडे (काँग्रेस तालुका अध्यक्ष), उषाताई कांबळे (महिला काँग्रेस प्रदेश सचिटणीस) शिलाताई पाटील (महिला काँग्रेस जिल्हा अध्यक्ष) नेमीचंद पाटील (रा.काँ.पार्टी शरदचंद्र पवार), मुक्तेश्वर येवरे (शिवसेना तालकाप्रमुख उ.बा.ठा), महेश धुळशेट्टे (शहराध्यक्ष काँग्रेस), बस्वराज काळे (शहराध्यक्ष रा.काँ शरदचंद्र पवार), तालुका उपाध्यक्ष दत्ता पवार, नितीन धुळशेट्टे (शिवसेना शहरप्रमुख उ बा ठा), धोंडीराम पाटील, संग्राम नामवाड (नगरसेवक न. प. जळकोट), संग्राम कांबळे ता अध्यक्ष काँग्रेस अ जा), नूर पठाण, (तालुकाध्यक्ष अल्पसंख्याक काँग्रेस), संजय गायकवाड (प्रदेश सरचिणीस रा काँ शरदचंद्र पवार सामाजिक न्याय विभाग), राजेश मोतेवाड (संचालक कृ उ बा समिती जळकोट),  स्वामी हावगी गुरुनाथ (तालुका अध्यक्ष परिवहन विभाग), प्रमोद  दाडगे (युवक काँग्रेस तालुका कार्याध्यक्ष) एकनाथ घोनशेट्टे (तालुका उपाध्यक्ष युवक काँग्रेस), सुधाकर सोनकांबळे (तालुका उपाध्यक्ष काँग्रेस अ जा विभाग ), अ‍ॅड. श्रीनिवास मंगनाळे, संतोष डूमणे, सत्यम लांडगे, विश्वनाथ इंद्राळे (संचालक कृ उ बा समिती जळकोट), संभाजी कोसंबे (संचालक कृ उ बा समिती जळकोट), मैनोद्दीन बिरादार, नामदेव काकरे, विशाल पाटील, शिवप्रसाद लांडगे, आनंद चट, मोहन लोहकरे, मुजमिल मुण्डकर, गोंिवंद कोकने, जळबा डूमने, माधवराव पाटील, तुकाराम माने, मारोती माने, अण्णाराव पवार, व्यंकट केंद्रे, विठल लोहकरे, धोंडीराम केंद्रे, निलेश नाईक, धनराज दळवे, उत्तम मुंडकर,ज्ञानोबा पाटील, अमरजित पाटील, प्रमोद सुर्यवंशी, दिलीप कांबळे, वैजेनाथ चव्हाण, भीमराव केंद्रे, संजय सुर्यवंशी, बालाजी टाकबिडे, बालाजी शिवशेट्टे, राजीव पाटील, व्यंकटराव खटके, गंगाधर गर्दिवाड, बालाजी धुळशेट्टे, अयुब पटेल, इस्माईल पटेल यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR