22.3 C
Latur
Sunday, September 8, 2024
Homeमहाराष्ट्रजळगावमध्ये अपक्ष आमदार करतोय एकट्याने प्रचार

जळगावमध्ये अपक्ष आमदार करतोय एकट्याने प्रचार

जळगाव : लोकसभा निवडणुकीचे तीन टप्पे आता पार पडले आहेत. यामध्ये जवळपास अर्धी निवडणूक संपली आहे. सोमवारी चौथ्या टप्प्यातील मतदान पार पडणार आहे. या चौथ्या टप्प्यात महाराष्ट्रातील जळगाव लोकसभा मतदारसंघासाठी देखील मतदान होत आहे. पण या मतदारसंघातील अपक्ष उमेदवाराचा एक व्हीडीओ सध्या सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. त्याची सर्वत्र चर्चा सुरू आहे.

जळगाव लोकसभा मतदारसंघातील आमदार ललित ऊर्फ बंटी शर्मा हे स्वत:चा प्रचार एकट्यानेच करत आहेत. लोकांमध्ये जाऊन हातात स्पीकर घेऊन तसेच दुस-या हातात स्वत:चे नाव, चिन्ह क्रमांक असलेला फलक घेऊन ते जनतेला आपल्यालाच मतदान करण्याचे आवाहन करत आहेत. मार्केटमध्ये तसेच रहदारीच्या रस्त्यावर उभे राहून भर उन्हात त्यांचा प्रचार सुरू आहे.
त्यांच्या या प्रचाराचा व्हीडीओ सध्या सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. आपल्या निवडणूक प्रक्रियेचा भेसूर चेहरा देखील समोर येतो. कारण जर तुमच्याकडे भरपूर पैसा, संघटन असेल तरच तुम्ही निवडणूक लढवू शकता अशी सध्या परिस्थिती आहे. त्यामुळेच ललित शर्मांचा एकट्याने सुरू असलेला प्रचार बरंच काही सांगून जातो.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR