25.3 C
Latur
Thursday, June 27, 2024
Homeमहाराष्ट्रजळगावात पेट्रोल पंपाला आग

जळगावात पेट्रोल पंपाला आग

जळगाव : जळगाव जिल्ह्यातील जामनेर-बोदवड रोडवरील एका पेट्रोल पंपावर आज मोठी आग भडकली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या पेट्रोल पंपावर एक वाहनचालक आपल्या दुचाकीत नेहमीप्रमाणे इंधन भरण्यासाठी आला असता अचानक आग भडकली आणि क्षणातच आगीने रौद्र रूप धारण केले.

आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी स्थानिक नागरिक, पेट्रोल पंपावरील कर्मचारी आणि प्रशासनाला चांगलेच प्रयत्न करावे लागले. मात्र, थोड्या वेळाने आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले. या घटनेत कोणतेही जीवित हानी झाली नसून, आगीचे कारण अद्याप समजू शकले नाही.

दरम्यान, देशात आणि राज्यात मागील काही दिवसांपासून विविध प्रकारच्या कंपन्यांना लागणा-या आगीच्या घटनांत वाढ झाली असून, अनेक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. जळगावच्या पेट्रोल पंपावरील आगीच्या घटनेमध्ये कोणत्याही प्रकारची जीवित हानी झाल्याचे वृत्त नसले तरी मोटारसायकल आणि पंपाच्या एका युनिटचे मोठे नुकसान झाले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR