24.4 C
Latur
Saturday, January 11, 2025
Homeलातूरजवानांची नवीन तुकडी देश सेवेसाठी सज्ज

जवानांची नवीन तुकडी देश सेवेसाठी सज्ज

चाकूर : प्रतिनिधी
येथील सीमा सुरक्षा दलाची १८१ प्रशिक्षित जवानाची नवीन तुकडी प्रशिक्षण घेऊन देशसेवेसाठी सज्ज झाली आहे. या तुकडीचा दि. २० जानेवारी शनीवार रोजी, सहाय्यक प्रशिक्षण केंद्र, चाकूर (महाराष्ट्र)च्या श्री छत्रपती शिवाजी महाराज परेड ग्राउंडवर या दलातील १८१ नवीन कॉन्स्टेबलचा भव्य शपथ समारंभ परेड आयोजित करण्यात आला होता.
या शपथ परेडची सलामी चाकूर सहायक प्रशिक्षण केंद्राचे महानिरीक्षक सुरेशचंद यादव यांना दिली. या भव्य परेडचे नेतृत्व नूतन हवालदार पडोलकर राहुल शिवाजी यांनी केले. हे नवीन हवालदार जे उत्तीर्ण होण्यासाठी सहभागी झाले आहेत, त्यांचे प्रशिक्षण प्रशिक्षण दिनांक १७ एप्रिल २०२३ ते दिंनाक २० जानेवारी २०२४ पर्यत ३८ आठवड्यांचे होते. यामध्ये महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, हरियाणा, बिहार, गुजरात, उतराखण्ड, झारखण्ड, राजस्थान, मध्य प्रदेश, मणीपुर, पंजाब, त्रिपुरा व जम्मू-कश्मीर आदी राज्यातील  नवीन हवालदारांचा समावेश आहे. या कार्यक्रमादरम्यान, त्यांच्या प्रशिक्षण कालावधीत उत्कृष्ट कामगिरी करणा-या प्रशिक्षणार्थींना सुरेशचंद यादव, महानिरीक्षक, सहाय्यक प्रशिक्षण केंद्र चाकूर यांच्या हस्ते पारितोषिक देण्यात आले,
 त्यापैकी बॅच क्रमांक १८३ चे ऑल ऑवर फर्स्ट गोल्ड मेडल आरक्षक पंकज तिवारी तथा ऑल ऑवर सेकेण्ड का सिल्वर मेडल आरक्षक रोहित रोहिला यांना प्रदान करण्यात आले. या प्रशिक्षणा दरम्यान या सैनिकांना शारीरिक कार्यक्षमता, शस्त्रे, दारुगोळा, फील्ड क्राफ्ट, नकाशा वाचन आणि फील्ड इंजिनीअरिंगचे प्रशिक्षण देण्यात आले. या विषयांशिवाय अंतर्गत सुरक्षा कर्तव्य, सीमा व्यवस्थापन, कायदा आणि मानवाधिकार इत्यादी विषयांवरही प्रशिक्षण देण्यात आले आहे. सुरेशचंद यादव, महानिरीक्षक, सहायक प्रशिक्षण केंद्र, चाकूर यांनी नवीन हवालदारांचे अभिनंदन
केले.
यावेळी संबोधित करताना ते म्हणाले की, प्रशिक्षणानंतर ते भारताच्या विस्तृत सीमेच्या सुरक्षेसाठी तैनात केले जातील आणि दिलेल्या उत्कृष्ट प्रशिक्षणानंतर ते इतके सक्षम झाले आहेत की ते सीमेवरील कठीण परिस्थितीला तोंड देताना देशाच्या सीमांचे रक्षण करू शकतात. भारताच्या सुरक्षेची जबाबदारी घेण्यास सक्षम आहेत आणि ज्या पालकांनी आपल्या शूर मुलांना सीमा सुरक्षा दलाच्या माध्यमातून देशसेवा करण्यासाठी पाठवले त्या पालकांनाही त्यांनी सलाम केला. यावेळी उपस्थित मान्यवर आयपीएस बी. चंद्रकांत रेड्डी आणि इतर सर्व मान्यवरांचे त्यांनी आभार मानले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR