22.1 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeलातूरजवाब दो... आंदोलनाला वाढता पाठिंबा

जवाब दो… आंदोलनाला वाढता पाठिंबा

लातूर : प्रतिनिधी
गेल्या दीड-दोन महिन्याच्या कालावधीत लातूर शहर व जिल्ह्यात दलित समाजातील तीन तरुणाचा खून केल्याच्या विविध ठिकाणी घटना घडल्या. तर एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार करुन तिची क्रूरपणे हत्या केल्याच्या घटना घडल्या आहेत. तसेच दोन दलित तरुणांवरील अत्याचाराच्या संतापजनक घटना घडल्या आहेत. या सर्व घटना जातीय मानसिकतेतून घडवण्यात आल्या आहेत. या प्रकरणातील आरोपीवर खुनाचे गुन्हे दाखल करुन अ‍ॅट्रॉसिटीचे गुन्हे दाखल करावेत, सीआयडीमार्फत चौकशी करावी. यासह इतर मागण्यांसाठी लातूर शहरातील महात्मा गांधी चौकात दि. ६ ऑगस्टपासून दलित हत्याकांड-जवाब दो आंदोलन सुरु आहे. या आंदोलनास दुस-याही दिवशी वाढता पाठींबा मिळाला आहे.
दलित हत्याकांडाच्या घटना वाढत आहेत. लातूर शहरातील जेएसपीएम शिक्षण संस्थेच्या वसतिगृहात शिकणारा परळी येथील १३  वर्षीय अरविंद खोपे या विद्यार्थ्यांचा संशयात्मक मृत्यू झाला आहे. त्या आधी चाकूर तालुक्यातील नायगाव येथील सायली गायकवाड या १५ वर्षीय दलित विद्यार्थिनीचा लातूरच्या एका वसतिगृहात बलात्कार करुन तिचा निर्घृणपने खून करण्यात आला.  या शिवाय औसा तालुक्यातील भुसनी येथील आकाश सातपुते या दलित तरुणाची हत्या करण्यात आली. तसेच देवणी येथील सचिन सूर्यवंशी या तरुणाची हत्या केली. गांजूर दलित अत्याचार प्रकरणातील दलित कार्यकर्त्यांवरील ३५३ सारखे खोटे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
मात्र पोलीस या घटनांचा तपास गांभीर्याने करीत नाहीत, असा आरोप करुन या व जिल्ह्यातील दलित अन्याय, अत्याचाराच्या सर्वच घटनेतील सर्व आरोपींना तात्काळ अटक करुन सदर खटले फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून आरोपीना  फाशीची शिक्षा देण्यात यावी. या मागण्यांसाठी ‘जवाब दो’, धरणे आंदोलन गेल्या दोन दिवसांपासून सुरु आहे.  या आंदोलनाला पहिल्या दिवसाप्रमाणेच दुस-याही दिवशी भीमसैनिक, महिला, पुरुष व तरुणाचा सहभाग होता.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR