21.2 C
Latur
Thursday, January 16, 2025
Homeलातूरजागृती शुगर ३ हजार रुपयांपेक्षा अधिक भाव देणार

जागृती शुगर ३ हजार रुपयांपेक्षा अधिक भाव देणार

देवणी : प्रतिनिधी
शेतक-यांच्या जिवनात आर्थिक क्रांती घडवून आणणारा जागृती कारखाना विद्यमान गळीत हंगामात उसाला कमीत कमी ३ हजार रुपये प्रती टन दर देणार असुन शेतक-यांचे आर्थिक, शैक्षणिक, आरोग्य यासह सामाजिक जिवनमान उंचावण्यासाठी मांजरा परिवारातील सर्व कारखाने  प्रयत्नशील राहणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे माजी मंत्री तथा जागृती शुगरचे संस्थापक अध्यक्ष दिलीपराव देशमुख यांनी गुरुवारी येथे बोलताना केले.
देवणी तालुक्यातील  तळेगाव (भो.) येथील जागृती शुगर अ‍ॅण्ड अलाईड इंडस्ट्रीज येथील नूतन काँम्प्रेस्ड बायोगँस प्रकल्पाच्या उद्घाटनप्रसंगी माजी मंत्री दिलीपराव देशमुख बोलत होते. यावेळी प्रमुख पाहुणे  म्हणुन लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष तथा माजी आमदार धिरज विलासराव  देशमुख, माजी आमदार अ‍ॅड. त्र्यंबक भिसे, जागृती शुगरचे उपाध्यक्ष लक्ष्मणराव मोरे, राज्य साखर संघाचे संचालक आबासाहेब पाटील, रेणा साखरचे माजी चेअरमन यशवंतराव पाटील, उजालाचे उजाला बायो एनर्जीचे संचालक किर्ती प्रजापती, जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष श्रीशैल्य उटगे, रेणाचे अध्यक्ष सर्जेराव मोरे, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अ‍ॅड. प्रमोद जाधव  ट्वेंटी वन शुगरचे उपाध्यक्ष विजय देशमुख, विलास साखर कारखान्याचे उपाध्यक्ष रवींद्र काळे, लातूर बाजार समितीचे सभापती जगदीश बावणे, उदगीर बाजार समितीचे सभापति शिवाजी हुडे, उपसभापती प्रीती भोसले, रेणाचे उपाध्यक्ष अनंतराव देशमुख, जिल्हा बँकेचे संचालक अशोक गोविंदपुरकर, जयेश माने, पृथ्वीराज शिरसाठ, जिल्हा बँकेच्या संचालिका सौ. स्वयंप्रभा पाटील, श्रीमती लक्ष्मीबाई भोसले, मारोती पांडे, राजकुमार पाटील, व्यंकटराव बिरादार, संतोष देशमुख, मारुती महाराज साखर कारखान्याचे अध्यक्ष शामराव भोसले, उपाध्यक्ष सचिन पाटील, शिलाताई पाटील, बालाजी बिराजदार, संभाजी रेड्डी, उजाला बायो एनर्जीचे सीईओ डॉ. आलोक अग्रवाल जागृती शुगर चे जनरल मॅनेजर गणेश येवले यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.
पुढे  बोलताना माजी मंत्री दिलीपराव देशमुख म्हणाले की, कारखाने हे समाजातील प्रत्येक घटकाला दीर्घकाळ मदत देणारे घटक आहेत. शासनाच्या तुटपुंज्या मदतीची अपेक्षा न ठेवता शेतक-यांनी स्वावलंबी बनले पाहिजे. ऊस हे उर्जा निर्माण करणारे पिक आहे. त्या माध्यमातून समाजातील सर्वच घटकांचा सर्वांगीण विकास होणे गरजेचे आहे. शेतमालावर प्रक्रिया करणारी कारखानदारी सक्षम होणे आवश्यक असुन त्या माध्यमातून शेतक-यांना अधिक चांगले दिवस येणार आहेत.अधिकाधिक भाव देताना कारखान्यांनी आपले अर्थकारण बिघडणार नाही याची काळजी घेतली पाहिजे, असे सांगुन जागृती शुगर उस उत्पादक  शेतक-यांना उसाला कमीत कमी ३ हजार रुपये प्रति मेट्रिक टन भाव देणार असल्याचे सांगून जागृति शुगर ने नेहमीच शेतक-यांना अधिक भाव देण्याचा प्रयत्न केला असून यावर्षी योग्य भाव देण्याचा प्रयत्न राहणार असल्याचे त्यांनी सांगितले
प्रास्ताविक करताना जागृती शुगरचे उपाध्यक्ष लक्ष्मणराव मोरे यांनी जागृती शुगरच्या १४ वर्षाचा कालखंडात कारखान्याने अतिशय सूक्ष्म नियोजन पारदर्शकता ठेवून माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली उस उत्पादक शेतक-यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचे काम केले कारखान्याने नविन तंत्रज्ञान विकसित करून उपपदार्थ प्रकल्प कार्यान्वित केल्याने उसाला योग्य भाव देण्यात आला जिल्हाभरात कधी काळी १० लाख टन उसाचे गाळप व्हायचे आज ७० लाख टन उत्पादनाची क्षमता झालेली आहे यामुळे १० पट एरीकेशन वाढले आहे असे सांगून जागृति शुगर ने नेहमीच उस उत्पादक शेतक-यांना शेतक-यांना एफ आर पी पेक्षा अधिक  दर देत लोकांचा विर्श्वास संपादन केला आहे असेही त्यांनी यावेळी सांगितले कार्यक्रमाचे आभार जनरल मॅनेजर गणेश येवले यांनी मांडले. याप्रसंगी जागृती शुगर च्या चालु गाळप हंगामात उत्पादित झालेल्या ५ लाख ७५ हजार (प्रती ५० कीलो) साखर पोत्याचे पूजन यावेळी कारखान्याचे संस्थपक अध्यक्ष माजी मंत्री दिलीपराव देशमुख माजी आमदार तथा जिल्हा बँकेचे चेअरमन धीरज विलासरावजी देशमुख यांच्या हस्ते अन्य मान्यवर यांच्या उपस्थितीत करण्यात आले.
यावेळी  जिल्हा बँकेचे माजी संचालक संभाजी सुळ, जिल्हा बँकेचे कार्यकारी संचालक हणमंतराव जाधव, रेणाचे कार्यकारी संचालक बी. व्ही. मोरे, विलास साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक देसाई, विकासरत्न विलासराव देशमुख मांजार शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक पंडित देसाई,  विलास साखर कारखान्याचे युनिट २ चे कार्यकारी संचालक पवार, मारुती महाराज साखर कारखान्याचे प्रभारी कार्यकारी संचालक रविशंकर बरमदे, मांजरा (कंचेश्वर) साखर कारखान्याचे सरव्यवस्थापक वाकडे, माध्यम समन्वयक हरिराम कुलकर्णी, दिलीप पाटील, चांदपाशा इनामदार, अ‍ॅड. श्रीरंग दाताळ, सचिन दाताळ, सुपर्ण जगताप, बालाजी कारभारी, मालबा घोणसे, राम भंडारे, अनिल पाटील, विजय पाटील, संजय रेड्डी, शेषराव पाटील, बालाजी बोबडे, विलास, मांजरा, रेणा, जागृती शुगर, मारुती महाराज बाजार समिती लातूर, उदगीर बाजार समितीचे सन्माननीय संचालक मंडळ उस उत्पादक शेतकरी उपस्थित होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR