लातूर : प्रतिनिधी
आपल्या देशात विविध जाती, धर्माचे लोक राहातात आणि हीच आपल्या देशाची खरी ओळख आहे. त्यामुळे जातीभेद न माणता बंधुभाव बाळगावा, असा संदेश तत्वदर्शी संत रामपाल महाराज यांची दिला. वर्षाखेरीस संत रामपाल महाराजांचा लातूर येथे सत्संग झाला. त्याप्रसंगी ते बोलत होते. देव अनेक परमेश्वर एक असलयाची माहिती चार वेद, भगवद्गीता, सहा शास्त्र, १८ पुराण, कुरआन शरीफ, बायबल, गुरु ग्रंथ व पाचवा वेद अर्थात मानवनिर्मित जातीच्या सर्व धर्मग्रंथाच्या आधारे परमेश्वर एक असल्याचे, साकार असल्याचे शास्त्र प्रमाणित माहिती सोप्या भाषेतून संत्संगातून विश्लेषण करुन सांगीतले. या सत्संगास भाविक, भक्त मोठया संख्येने उपस्थित होते. सत्संगाच्या यशस्वीतेसाठी लातूर जिल्ह्याचे जिल्हा सेवादार दयानंद दास राठोड, विठ्ठल दास परतवाड, सचिनदास जाधव, माधवदास भोजने व सर्व सेवादार यांनी सहकार्य केले.