37.7 C
Latur
Monday, March 31, 2025
Homeअंतरराष्ट्रीयजालियनवाला हत्याकांड; ब्रिटीश संसदेत चर्चा सुरू! सरकारकडे माफीच्या निवेदनाचा आग्रह

जालियनवाला हत्याकांड; ब्रिटीश संसदेत चर्चा सुरू! सरकारकडे माफीच्या निवेदनाचा आग्रह

लंडन : वृत्तसंस्था
१३ एप्रिल १९१९ रोजी घडलेल्या जालियनवाला हत्याकांडाला आता १०६ वर्ष पुर्ण होतील. एवढा काळ उलटला असला तरीही त्याच्या जखमा आजही भारतीयांच्या मनात आहेत. पण, आपल्या लष्करी अधिका-याच्या क्रूरतेची माफी अद्याप ब्रिटनने माफी मागितलेली नाही. यावर अनेकदा चर्चा झाली आहे. याप्रकरणी एप्रिल २०१९ मध्ये ब्रिटनच्या पंतप्रधान थेरेसा मे यांनी संसदेत माफी नाही तर केवळ खेद व्यक्त केला होता. अशातच आता जालियनवाला बाग हत्याकांडाची गोष्ट अभिनेता अक्षय कुमार आपल्या ‘केसरी चॅप्टर २’ चित्रपटातून दाखवणार आहे. त्यामुळे ही घटना पुन्हा चर्चेत आली आहे आणि यातच पुन्हा एकदा जालियनवाला बाग हत्याकांडाचा मुद्दा ब्रिटिश संसदेत उपस्थित करण्यात आला आहे.

ब्रिटनने १०६ वर्षे जुन्या या घटनेबद्दल भारतीयांची माफी मागावी अशी मागणी होत आहे. विशेष म्हणजे ही मागणी ब्रिटिश खासदार बॉब ब्लॅकमन यांनी केली आहे. जालियनवाला बाग घटनेबाबत ब्लॅकमन यांनी हाऊस ऑफ कॉमन्समध्ये भाषण दिलं. ते म्हणाले, १३ एप्रिल १९१९ रोजी अनेक लोक कुटुंबियांसोबत शांततापूर्ण वातावरणात एकत्र आले होते. त्यावेळी ब्रिटीश सैन्यातील जनरल डायरने आपल्या सैनिकांना दारुगोळा संपेपर्यंत त्या निष्पाप लोकांवर गोळीबार करण्याचे आदेश दिले होते. या हत्याकांडात १५०० लोक मारले गेले आणि १२०० लोक जखमी झाले होते.

येत्या १३ एप्रिल २०२५ ला जालियनवाला बाग हत्याकांडाचा १०६ वा वर्धापन दिवस आहे. तर मग आता आपण सरकारकडून चूक झाली, हे मान्य करून, अखेर भारताच्या लोकांची औपचारिक माफी मागण्यासाठी एक निवेदन जारी करू शकतो का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

या हत्याकांडानंतर देशभरात संतापाची लाट उसळली. याच्या चौकशीसाठी नेमलेल्या हंटर कमिशनने या गोळीबारात केवळ ३७९ लोकांचा मृत्यू झाल्याचं सांगितलं. मात्र प्रत्यक्षात अनेकजण हुतात्मा झाले होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR