16.8 C
Latur
Friday, November 22, 2024
HomeUncategorizedजिंतूरात डीजेच्या आवाजाने एकाचा मृत्यू, तीघे अस्वस्थ

जिंतूरात डीजेच्या आवाजाने एकाचा मृत्यू, तीघे अस्वस्थ

जिंतूर : शहरातील गणरायाच्या विसर्जन मिरवणुकीत डीजेच्या कर्कश्श आवाजाने दि.१७ सप्टेंबर रोजी रात्री ८.३० वाजेच्या दरम्यान एका कार्यकत्यार्चा मृत्यू झाला असून तिघे अस्वस्थ आहेत. तिघांना परभणी जिल्हा शासकीय रुग्णालयात पुढील उपचारासाठी पाठवण्यात आले असून एकावर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी डि जे वाहनाना पोलीसांनी ताब्यात घेतले आहे.

शहरातून गणरायाच्या विसर्जन मिरवणूकीस मोठ्या थाटामाटात गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या म्हणत सुरू होती. मिरवणुकीस सायंकाळी ५च्या सुमारास प्रारंभ झाला. शहरातील येलदरी रोडने सुरू झालेली गणरायाची मिरवणूक जिंतूर पोलीस ठाण्यासमोर आली असता या मिरवणुकीत चार डीजे चालू होते. या पैकी एका मंडळाने आणलेल्या डीजेवरील कर्णकर्कश्श आवाजामुळे संदीप विश्वनाथ कदम (वय ३८) रा.बोर्डी ता.जिंतूर या कार्यकर्त्यास अस्वस्थपणा आल्याने तातडीने गणेश भक्तांनी त्यांस ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले.

त्यांस वैद्यकीय अधिका-यांनी तपासून मृत घोषित केले. यावेळी तर शिवाजी कदम, गोविंद कदम व अन्य एक युवकांची प्रकृती खालावल्याने प्राथमिक उपचार करून परभणी जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारार्थ रवाना करण्यात आले आहे. गणेश भक्तांचे स्वागत सोहळ्यात सहभागी असलेल्या आ. मेघना बोर्डीकर, भावना बोर्डीकर, सभापती गंगाधरराव बोर्डीकर, माजी नगराध्यक्ष सचिन गोरेसह अनेक मंडळीनी तात्काळ अफाट गर्दी लोटत रुग्णालयात पोहचले होते.

उपविभागीय अधिकारी जिवन बेनीवाल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक बुध्दीराज सुकाळे यांच्या पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. जिंतूर पोलीसात कैलास कदम रा .बोर्डी यांच्या फिर्यादीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सपोनि पुंड करत आहे.

डि जे मालक, चालक, गणेश मंडळ अध्यक्षावर गुन्हा नोंद
ही घटना घडताच मिरवणुकीत असलेल्या चार डि जे वाहन चालकांनी मिरवणूक सोडून पळ काढताच पोलीसांनी पाठलाग करत रात्री उशिरा पोलिस ठाण्यात आणून डि जे वाहन लावले. विना परवाना डी.जे वर गाणे वाजविले व बी.एन.एस.एस कलम १६८ प्रमाणे आदेशाचे उल्लंघन केले, तसेच जिल्हाधिकारी यांनी लागु केलेल्या कलम ३७ (१) (३) महाराष्ट्र पोलीस कायदयाचे उल्लंघन केल्याने तीन डि.जे.चालक, मालक, गणेश मंडळ अध्यक्ष,अपरेटवरवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर एकावर गुन्हा नोंद सुरू असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR