26.7 C
Latur
Monday, January 6, 2025
Homeमहाराष्ट्रजिरेटोप डोक्यावर परिधान करण्यास फडणवीसांचा विनंतीपूर्वक नकार

जिरेटोप डोक्यावर परिधान करण्यास फडणवीसांचा विनंतीपूर्वक नकार

पुणे : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पिंपरी- चिंचवडमधील देवाची आळंदी येथे जाऊन संत कृतज्ञता कार्यक्रमात सहभाग घेतला. यावेळी, येथील संत, महात्म्यांकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती देऊन आणि जिरेटोप देऊन सन्मान करण्यात आला. मात्र, छत्रपती शिवरायांचा जिरेटोप घालण्यास मुख्यमंत्र्­यांनी नम्रपणे नकार दिला. सध्या हा व्हीडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

दरम्यान, यावेळी स्वामी गोविंद गिरी महाराज व तेथील संतांनी छत्रपती शिवाजी महाराज परिधान करत असलेल्यासम जिरेटोप देऊन डोक्यावर परिधान करण्याची विनंती मुख्यमंत्र्­यांना केली. छत्रपती शिवरायांचा आदर ठेवत मुख्यमंत्री फडणवीस यांनी जिरेटोप डोक्यावर परिधान करण्यास नकार देत आपण शिवरायांचा मावळा असल्याचे म्हटले. विशेष म्हणजे जिरेटोप डोक्याला लावत फडणवीसांनी तो संतांकडे परत केला.

मान्यवरांनी आग्रह केल्यानंतरही फडणवीसांनी विनंतीपूर्वक नकार दिला. तसेच, आपण छत्रपतींच्या मावळ्यासमान असल्याची प्रतिक्रिया देत जिरेटोप परिधान न करता त्याला नमन केल्याचे पाहायला मिळाले. सध्या आळंदीच्या समाधीस्थळ परिसरातील या घटनेचा व्हीडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून देवेंद्र फडणवीसांचे कौतुक होत आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR