32.1 C
Latur
Monday, April 28, 2025
Homeलातूरजिल्हाधिकारी कार्यालयात सेवा हक्क दिनानिमित्त शपथ

जिल्हाधिकारी कार्यालयात सेवा हक्क दिनानिमित्त शपथ

लातूर : प्रतिनिधी
महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम २०१५ च्या अंमलबजावणीस दहा वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने दशकपूर्तीचे औचित्य साधून जिल्हाधिकारी कार्यालयात सेवा हक्क दिन आयोजित करण्यात आला होता. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचा-यांनी लोकसेवा हक्क विषयक शपथ घेतली. तसेच, महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम २०१५ अंतर्गत उपलब्ध विविध सेवांचा लाभ घेण्यासाठी तयार करण्यात आलेल्या क्यूआर कोड फलकाचे अनावरण करण्यात आले.
या कार्यक्रमास प्रभारी अतिरिक्त जिल्हाधिकारी संगीता टकले, निवासी उपजिल्हाधिकारी केशव नेटके, रोजगार हमी योजना उपजिल्हाधिकारी अहिल्या गाठाळ, प्रभारी जिल्हा पुरवठा अधिकारी व्यंकट रावलोड आणि तहसीलदार काकडे यांची प्रमुख उपस्थिती होती. उपजिल्हाधिकारी अहिल्या गाठाळ यांनी महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम आणि त्याअंतर्गत अधिसूचित सेवांबाबत तसेच संबंधित तरतुदींची सविस्तर माहिती दिली. तहसीलदार काकडे यांनी आतापर्यंत प्रदान करण्यात आलेल्या सेवांचा आढावा सादर केला. महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमांतर्गत अधिसूचित सेवांसाठी ऑनलाइन अर्ज सादर करण्याकरिता क्यूआर कोड तयार करण्यात आला आहे. या क्यूआर कोडच्या फलकाचे अनावरण उपस्थित मान्यवरांच्या हस्ते यावेळी करण्यात आले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR