17.3 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeलातूरजिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे

शिरुर अनंतपाळ : प्रतिनिधी
मायणी-म्हसवड राज्य मार्ग साकोळ मध्यम प्रकल्पाच्या पाळूपासून न जाता साकोळ मार्ग  तिपराळ – देवणी जावा, या मागणीसाठी साकोळ ग्रामस्थ आक्रमक झाले असून शुक्रवारी साकोळ ग्रामस्थांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले व  मागणीचे निवेदन जिल्हाधिका-यांना देण्यात आले.
   साकोळ गावांवर तालुका करण्यापासून अनेक बाबतीत शासन व लोकप्रतिनिधीकडून डावलले जात असल्याची भावना साकोळवासीय व्यक्त करीत आहेत. त्यात प्रस्तावित असलेला मायणी-म्हसवड ते देवणी राज्यमार्ग साकोळ वगळून जात असल्याने ग्रामस्थातून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.मंगळवारी साकोळ- देवणी रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन केले. त्यानंतर शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले.
 दरम्यान मायणी,-मसवड-टेंभुर्णी, माळशिरस -बार्शी -लातुर-शिरूर अनंतपाळ-तळेगाव दे. क्र. १४५ हा राज्यमार्ग साकोळ येथून न जाता साकोळ पासून १ कि.मी. अंतरावरून साकोळ मध्यम प्रकल्पाच्या पाळूला लागून तिपराळ येथून जात आहे. याबाबत अधीक्षक कार्यालय लातूर, कार्यकारी अभियंता निलंगा व विविध सर्व यंत्रणा मंत्रालय यांना वारंवार निवेदनाद्वारे कळवूनही दखल घेतली जात नसल्याने दि.२७ सप्टेबर शुक्रवार रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साकोळ ग्रामस्थांच्या वतीने एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. हा राज्य मार्ग साकोळमधून करण्यात यावा, यासाठी लोकशाही मार्गाने विविध आंदोलन करण्याचे साकोळ ग्रामपंचायत व ग्रामस्थांनी ठरविले आहे.
    या आंदोलनात काँग्रेस नेते अभय साळुंके, साकोळचे सरपंच कमलाकर मादळे, उपसरपंच राजकुमार पाटील, माजी सरपंच अब्दुलअजीज मुल्ला, ग्रामपंचायत सदस्य नवनाथ डोंगरे, मधुकर कांबळे, सलीम मुल्ला, सचीन माळी, बबन पाटोळे, मनोज आवाळे यांच्यासह विविध क्षेत्रातील नागरिक व ग्रामस्थ सहभागी झाले होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR