चाकूर : प्रतिनिधी
आगामी जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत लोकांनी शिफारस केलेले उमेदवार देणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांनी केले. चाकूर तालुक्यातील रोहिणा येथे आगामी जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रोहिणा जिल्हा परिषद मतदार संघाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवाजीराव काळे हे उपस्थित होते. मंचावर नगराध्यक्ष करीमसाहेब गुळवे, माजी नगराध्यक्ष उषा कांबळे, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक यशवंतराव जाधव, तालुका कार्याध्यक्ष भानुदासराव पोटे, सरपंच दयानंदराव सुरवसे, तालुका उपाध्यक्ष गणपतराव कवठे, नंदकुमार पवार, नगरसेवक इलियास सय्यद, विष्णुकांत तिकटे, सिद्धेश्वर अंकलकोटे, मिलिंदराव महालिंगे, मधुकरराव मुंडे, गंगाधर अक्कानरू, भुजंगराव केंद्रे, भीष्मनारायण केंद्रे के, सिद्धेश्वर लोहारे, मनोजराव पाटील, संदीप शेटे, मच्छीद्र नागरगोजे, समाधान डोंगरे, ओम केंद्रे, संदीप पांचाळ, सुरज पटणे, धनराज बाचीफळे, अशोक घोरपडे, देवानंद पाटील, लक्ष्मणराव घुमे, रामकिशन चिंचोले, माडगे, व्यंकट कैलवाडे, राजू शिंदे, अशोकराव पाटील, अंतेश्वर पाटील, सूर्यकांत गव्हाणे, बब्रुवान केसाळे हे उपस्थित होते.
सहकार मंत्री पाटील म्हणाले की, गेल्या अनेक दिवसांपासून जिल्हा परिषदेच्या निवडणुका रखडल्या होत्या. मात्र आगामी काही दिवसात या निवडणुका जाहीर होणार आहेत. जिल्हा परिषदेच्या निवडणुका म्हणजे स्थानिक प्रश्नावरची निवडणूक असते त्यामुळे स्थानिक प्रश्नावर ज्यांचा अभ्यास आहे किंवा जे लोकात कायम राहणारे आहेत. लोकप्रश्न समजून घेऊन सोडवणार आहेत अशाच कार्यकर्त्यांना निवडणुकीत आपण संधी देणार असल्याचे सहकार मंत्री नामदार पाटील म्हणाले. मागील कालखंडात रोहिण्या गावातील अनेक प्रश्नांना न्याय देण्याचा प्रयत्न केला असून अजूनही काही प्रश्न राहिले असतील तर येणा-या निवडणुकीच्या नंतर ते सोडविण्याचा प्रयत्न या भागाचा लोकप्रतिनिधी म्हणून करणार असल्याचे सहकार मंत्री नामदार पाटील म्हणाले. सूत्रसंचालन बिलालखा पठाण यांनी केले. या कार्यक्रमास रोहिना जिल्हा परिषद मतदार संघातील सर्व १८ गावांतील शेकडोच्या संख्येने नागरिकांची उपस्थिती होती. कार्यकमाचे प्रास्ताविक मच्छींद्र नागरगोजे यांनी केले.

