रेणापूर : प्रतिनिधी
दरवर्षीची परंपरा कायम ठेवत यावर्षी बॅक स्तरावर १०० टक्के वसुली करून या संस्थांनी जिल्ह्यात वेगळा ठसा निर्माण करून आपले वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा बँकेचा पारदर्शक कारभारास अनेक दशकाची परंपरा आहे . केवळ कर्ज पुरवठा करणे व तो वसूल करणे एवढ्या पुरतेच कार्य मर्यादित नाहीत तर जिल्हा बँकेच्या वतीने शेतकरी व सर्वसामान्या हिताच्या व ते आथिकदृष्टया सक्षम झाले पाहिजे यासाठी विविध योजना राबविल्या जात असल्याने या बॅकेचा नावलौकिक केवळ राज्यापर्यंत राहिला नाही तर ती देशात आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहचला आहे, असे प्रतिपादन जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन तथा माजी आमदार धिरज विलासराव देशमुख यांनी केले.
२०२४ – २५ या आर्थिक वर्षात लातूर जिल्हा सहकारी बँकेची बॅक व संस्था स्तरावर शंभर टक्के वसुली देणा-या विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थाच्या चेअरमन व गटसचिवांचा सत्कार कार्यक्रमाचे आयोजन गुरुवारी दि १८ सप्टेंबर रोजी रेणापूर कृषी उपन्न बाजार समितीच्या सभागृहत करण्यात आले होते. ते अध्यक्षीय समारोप करताना बोलत होते. यावेळी रेणा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन व्हाईस चेअरमन प्रविण पाटील, जिल्हा बँकेचे व्हाईस चेअरमन अॅड प्रमोद जाधव, संचालिका अनिता केंद्रे, रेणुका खरेदीविक्री संघाचे चेअरमन माणिकराव सोमवंशी ,कृउबा सभापती उमाकांत खलंग्रे, अॅड. शेषेराव हाके, रेणाचे संचालक तुकाराम कोल्हे, गोविंद पाटील चंद्रकांत सूर्यवंशी, माजी जि प सदस्य सुरेश लहाने, माजी सभापती रमेश सोनवणे , प्रभाकर केंद्रे , दिलीप गोटके, रेणापूर कृउबाचे संचालक जनार्धन माने , प्रविण माने, प्रकाश सूर्यवंशी, विश्वनाथ कागले, अशोक राठेड, राजकुमार साळुके हे मंचावर प्रमुख उपस्थित होते .
माजी आ देशमुख म्हणाले की, इतर जिल्ह्याच्या तुलनेत लातूर जिल्ह्यात संस्कृत वातावरण आहे. पूर्वी जे नवे ते लातूर हवे अशी म्हण प्रचलित होती मात्र आज २१ व्या शतकात जे लातूर आहे ते आम्हाला हवे अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. जिल्ह्याने विविध क्षेत्रात नावलौकिकता मिळवली आहे. याच धोतक म्हणजे जिल्हा मध्यवर्ती बॅक होय. येथील नेतृत्वाने सहकार संस्थेत कधी राजकारण येऊ दिले नाही. केवळ विश्वस्त म्हणून काम पाहिले. त्यामुळेच सर्व सहकारी संस्था यशाच्या शिखरावर पोहचल्या आहेत. जिल्हा बँकेच्या माध्यमातून शेतकरी व सर्वसामान्य नागरीक आर्थिक दृष्टया सक्षम होण्यासाठी बॅकेच्या वतीने विविध योजना राबवल्या जातात. असे सांगून काही दिवसात स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणूका होणार असून या निवडणूकीसाठी कार्यकर्त्यांनी आपल्या विचारांची माणसे निवडून आणण्यासाठी आता पासूनच कामाला लागावे, असे आवाहन माजी आ. देशमुख यांनी केले.
प्रस्ताविकात जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अॅड. प्रमोद जाधव यांनी जिल्हा बँकेच्या वतीने माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली व बॅकेचे चेअरमन तथा माजी आ. धिरज विलासराव देशमुख यांच्या कुशल व कल्पक नेतृत्वाखाली शेतक-यांसाठी विविध नाविन्यपूर्ण योजना राबविल्यामुळे शेतक-यांच्या जीवनात आर्थिक सुबत्ता आली आहे. जिल्हा बॅक देशात अग्रन्य बॅक म्हणून ओळखली जात आहे म्हणूनच आतापर्यंत या बॅकेला ४४ विविध पुरस्कारांनी सन्मानीत करण्यात आले आहे. असे सांगून तालुक्यातील सेवा सहकारी संस्थांनी १०० टक्के वसुली देऊन जिल्ह्यात प्रथम येण्याची परंपरा कायम टिकवली आहे. बॅकेला सेवा संस्थांनी वेळोवेळी सहकार्य करावे बॅक आपल्या सदैव खंबीर पाठीशी आहे.
यावेळी तालुक्यातील बॅक स्तरावर १०० वसुली करणा-या सर्व चेअरमन व गटसचिव यांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार करून गौरव करण्यात आला. सुत्रसंचलन प्रमोद घोडके यांनी तर आभार विजय देशमुख यांनी केले. कार्यक्रमास तालुक्यातील सेवा सहकारी संस्थेचे चेअरमन, गटसचिव व कॉंग्रेस पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रेणापूर तालुक्यातील बॅकेच्या कर्मचा-यांनी परिश्रम घेतले.