लातूर : प्रतिनिधी
: मृग बहार २०२४-२०२५ मध्ये लातूर जिल्ह्यातील डाळींब, लिंबू, पेरु, सीताफळ व चिकू या पिकांसाठी प्रधानमंत्री पीक विमा योजनेतंर्गत पुनर्रचित हवामानावर आधारित फळपीक विमा योजना २०२४-२०२५ या कालावधीत लातूर जिल्ह्यामध्ये अधिसूचित तालुक्यातील अधिसूचित महसूल मंडळामध्ये राबविण्यात येत आहे. या योजनेत शेतक-यांनी सहभागी होण्याचे आवाहन कृषी विभागाने केले आहे. योजना कार्यान्वित करणारी बजाज अलियान्झ जनरल इन्शुरन्स कंपनी लि. पुणे ही विमा कंपनी शासनाच्या महावेध प्रकल्पांतर्गत स्थापन केलेल्या हवामान केंद्राने नोंदविल्या गेलेल्या हवामानाच्या तपशिलानुसार विमा योजनेत भाग घेतलेल्या शेतक-यांना परस्पर नुकसान भरपाई देईल. जिल्ह्यामध्ये सदर योजना या विमा कंपनीमार्फत कार्यान्वित केली जात आहे.
डाळींब या फळपिकासाठी अहमदपूर तालुक्यातील किनगाव, अहमदपूर, खंडळी, उदगीर तालुक्यातील नागलगाव, हेर, औसा तालुक्यातील औसा, लामजना, किनीथोट, किल्लारी, बेलकुंड, भादा, चाकूर तालुक्यातील चाकूर, नळेगाव, वडवळ नागनाथ, निलंगा तालुक्यातील निलंगा, औराद शहाजनी, रेणापूर तालुक्यातील कारेपूर, पानगाव महसूल मंडळांचा या योजनेत समावेश आहे. तसेच डाळिंब या पिकासाठी पीकविमा हप्ता भरण्याची अंतिम मुदत १४ जुलैपर्यंत आहे. या फळपिकासाठी विमा संरक्षित रक्कम १ लाख ६० हजार रुपये असणार आहे. शेतक-यांनी भरावयाची विमा हप्ता रक्कम ८ हजार रुपये राहील.
चिकू या फळपिकासाठी अहमदपूर तालुक्यातील अहमदपूर तालुक्यातील अहमदपूर महसूल मंडळाचा समावेश असून या फळपिकासाठी पीकविमा हप्ता भरण्याची अंतिम ३० जून राहील. तर विमा संरक्षित रक्कम रुपये ७० हजार रुपये आणि शेतक-यांनी भरावयाची विमा हप्ता रक्कम ३ हजार ५०० रुपये राहील. पेरु या फळपिकासाठी अहमदपूर तालुक्यातील अहमदपूर, खंडाळी, शिरुर ताजबंद, हाडोळती, औसा तालुक्यातील मातोळा, उजनी, जळकोट तालुक्यातील घोणसी, जळकोट महसूल मंडळात विमा योजना लागू आहे. या फळपिकासाठी पीकविमा हप्ता भरण्याची अंतिम तारीख २५ जून राहील. तर विमा संरक्षित रक्कम रुपये ७० हजार रुपये आणि शेतक-यांनी भरावयाची विमा हप्ता रक्कम ३ हजार ५०० रुपये राहील.
लिंबू या फळपिकासाठी उदगीर तालुक्याला हेर महसूल मंडळाचा समावेश असून या पिकासाठी पीक विमा हप्ता भरण्याची अंतिम तारीख २५ जून राहील. विमा संरक्षित रक्कम ८० हजार रुपये आणि शेतक-यांनी भरावयाची विमा हप्ता रक्कम ४ हजार रुपये राहील. सीताफळ या फळपिकासाठी अहमदपूर तालुक्यातील शिरुर ताजबंद, औसा तालुक्यातील उजनी, बेलकुंड, चाकूर तालुक्यातील आष्टा, निलंगा तालुक्यातील औराद शहाजनी, रेणापूर तालुक्यातील रेणापूर, पळशी, पोहरेगाव, पानगाव, कारेपूर, लातूर तालुक्यातील हरंगुळ बु., कन्हेरी, मुरुड बु. महसूल मंडळाचा समावेश राहील. या फळपीकविमा हप्ता भरण्याची अंतिम तारीख ३१ जुलै राहील. तर विमा संरक्षित रक्कम ७० हजार रुपये आणि शेतक-यांनी भरावयाची विमा हप्ता रक्कम ३ हजार ५०० हजार रुपये राहील.