29.9 C
Latur
Saturday, May 17, 2025
Homeलातूरजिल्ह्यातील १४५ प्रकल्पांत २४.०२ टक्के पाणीसाठा 

जिल्ह्यातील १४५ प्रकल्पांत २४.०२ टक्के पाणीसाठा 

लातूर : प्रतिनिधी
लातूर जिल्ह्यातील मांजरा आणि निम्न तेरणा या दोन मोठ्या प्रकल्पांसह आठ मध्यम व १३५ लघु असे एकुण १४५ प्रकल्पांचा प्रकल्पीय उपयुक्त पाणीसाठा ७०४.६०५ दशलक्ष घनमीटर आहे. मागील आठवड्याचा उपयुक्त पाणीसाठा १६९.२१२ दशलक्ष घनमीटर असून या १४५ प्रकल्पांत २४.०२ टक्के एवढा पाणीसाठा आहे. गतवर्षी याच तारखेला जिल्ह्यातील १४५ प्रकल्पाांत केवळ ४.२० टक्के पाणीसाठा होता.
लातूर, धाराशिव व बीड या तीन जिल्ह्यांसाठी महत्वपूर्ण असलेल्या मांजरा प्रकल्पात प्रत्यक्ष एकुण पाणीसाठा ८४.२८० दशलक्ष घनमीटर एवढा आहे. मृत पाणीसाठा ४७.१३० दशलक्ष घनमीटर, उपयुक्त पाणीसाठा ३७.१५० दशलक्ष घनमीटर असून उपयुक्त पाणीसाठ्याची टक्केवारी २०.९९ इतकी आहे. निम्न तेरणा या मोठ्या प्रकल्पात प्रत्यक्ष पाणीसाठा एकुण ६७.४९३ दशलक्ष घनमीटर, मृत पाणीसाठा २९.९६७ दशलक्ष घनमीटर, उपयुक्त पाणीसाठा ३७.५२६ दशलक्ष घनमीटर असून उपयुक्त पाणीसाठ्याची टक्केवारी ४१.१४ टक्के आहे. लातूर तालुक्यातील तावरजा, रेणापूर तालुक्यातील व्हटी, रेणापुर, उदगीर तालुक्यातील तिरु, देवर्जन, शिरुर अनंतपाळ तालुक्यातील साकोळ, घरणी व निलंगा तालुक्यातील मसलगा या आठ मध्यम  प्रकल्पांत एकुण पाणीसाठा ४१.७४१ दशलक्ष घनमीटर, मृत पाणीसाठा २४.८०६ दशलक्ष घनमीटर,
उपयुक्त पाणीसाठा १६.९३५ दशलक्ष घनमीटर असून या आठ मध्यम प्रकल्पांत १३.८६ टक्के पाणीसाठा आहे.
१३५ लघू प्रकल्पांमध्ये एकुण पाणीसाठा १२१.०९३ दशलक्ष घनमीटर, मृत पाणीसाठा ५५.४४३ दशलक्ष घनमीटर, उपयुक्त पाणीसाठा ६५.६५० दशलक्ष घनमीटर असून या १३५ लघू प्रकल्पांमध्ये १५.६७ टक्के पाणीसाठा आहे.  निलंगा तालुक्यातील मसलगा, लातूर तालुक्यातील चिकुर्डा लघु प्रकल्प, औसा तालुक्यातील येल्लोरी, अहमदपुर तालुक्यातील धसवाडी, भुतेकरवाडी, तेलगाव, कोप्रा किनगाव, येत्सार, हंगेवाडी, मावलगाव, शिरुर अनंतपाळ तालुक्यातील महाळंगी, जळकोट तालुक्यातील जंगमवाडी, हावरगा हे प्रकल्प जोत्याखाली आहेत तर निलंगा तालुक्यातील हाडगा, अहमदपूर तालुक्यातील ढाळेगाव प्रकल्प कोरडा आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR