रेणापूर : प्रतिनिधी
लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी बुधवारी दि २० नोव्हेंबर रोजी मतदान झाले. सायंकाळी ५ वाजेपर्यत ३ लाख ३४ हजार ६०५ मतदारापैकी २ लाख ३३ हजार ९५० जणांनी मतदानाचा हक्क बजावला ६९. ९२ टक्के मतदान झाले. जिल्ह्यात ६ विधानसभा मतदारसंघात लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक मतदान झाले .
लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघात एकूण ३ लाख ३४ हजार ६०५ मतदार आहेत. त्यात १ लाख ७६ हजार पुरुष तर १ लाख ५८ हजार ६०१ महिला असून, ३५८ सैनिक तर ४ तृतीयपंथी मतदारांची संख्या आहे. जे मतदार मतदान केंद्रापर्यंत मतदानासाठी येऊ शकत नाहीत अशा मतदारांसाठी विशेष व्यवस्था करण्यात आली होती . लातूर ग्रामीण मतदारसंघात एकूण ३६३ मतदान केंद्र होती . त्यात रेणापूर तालुक्यात १३६, लातूर तालुक्यात १८१ तर औसा तालुक्यात ४६ मतदान केंद्र निश्चीत करण्यात आले होती. १८ ते १९ वयोगटातील ३ हजार ९९१ मतदार असून ८५ वयोगाटाच्या पुढचे ८ हजार २७१ तर २ हजार ८१६ दिव्यांग मतदार आहेत.
यात दिव्यांग पुरुष १ हजार ८७८ व महिला ९३८ मतदार आहेत. ८५ वयोगटाच्या वरील मतदारांमध्ये पुरुषांची संख्या ८ हजार २७१ एवढी असून त्यात ३ हजार ६६० पुरुष तर ४ हजार ६२१ महिलां मतदारांचा समावेश आहे. विधानसभेची निवडणूक शांततापूर्ण वातावरणात पार पाडता यावी म्हणून मतदातसंघात विविध पथकांची व झोनची व्यवस्था करण्यात आली होती . त्यासाठी नोडल अधिकारी, आचारसंहिता पथक, स्थिर सर्वेक्षण पथक, भरारी पथके, व्हिडीओ सर्वेक्षण पथके, व्हिडीओची सुविधा असलेली टिम अशी यंत्रणा सज्ज करण्यात आली होती. रेणापूर तालुक्यात ८५ वयोगटापेक्षा अधिक वयाचे २ हजार ६१७, औसा विभागात १ हजार ५० तर लातूर विभागात ४ हजार ६१४ मतदार आहेत. वयोवृद्ध मतदारांचे मतदान प्रत्यक्ष त्यांच्या घरी जाऊन करून घेण्यात आले आहे .
दरम्यान कॉग्रेस महाविकास आघाडी चे उमेदवार धिरज देशमुख महायुतीचे उमेदवार कराड यांच्या सह १६ उमेदवार निवडणुक ंिरगणात उभे होते .बुधवारी दि २० नोव्हेंबर रोजी सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत मतदान झाले ३ लाख ३४ हजार ६०५ मतदारापैकी १ लाख २४ हजार ७४९ पुरुष मतदार तर १ लाख ९ हजार २०० महिला मतदार, इतर १ असे एकूण २ लाख ३३ हजार ९५० मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. ६९.९२ टक्के मतदान झाले. रेणापूर तालुक्यात किरकोळ घटना वगळत मतदाना दरम्यान कोठेही अनुचित प्रकार घडला नाही अशी पोलिस निरीक्षक प्रदीप काकडे यांनी दिली .