लातूर : विनोद उगीले
जिल्ह्यात दि. १ जानेवारी ते ३० नोव्हेंबर २०२५ दरम्यान विविध पोलीस ठाण्याच्यास् हद्दीत ३७ खुनाचा तर ६१ खुनाचा प्रयत्न केल्याच्या घटना घडल्या असून जिल्हा पोलीस अधिक्षक अमोल तांबे यांनी पदभार स्विकारल्या पासून गुन्ह्यांचा आलेख खालावताना दिसत आहे.
मागील वर्ष २०२४ मध्ये १ जानेवारी ते ३० नोव्हेंबर या ११ महिन्याच्या कालावधीत तब्बल ५७ खुनाच्या घटना घडल्या होत्या या दाखल ५७ खुनाच्या घटना पैकी ५६ गुन्ह्याची उकल करण्यात पोलीसांना यश आले होते तर लातूर ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका दाखल गुन्ह्याची उकल करण्यात पोलीसांना अपयश आले होते.
तर दि. १ जानेवारी ते ३० नोव्हेंबर २०२५ दरम्यान विविध पोलीस ठाण्याच्या हद्दीत ३७ खुनाचा तर ६१ खुनाचा प्रयत्न केल्याच्या घटना घडल्या आहेत. यावर्षी २०२५ मध्ये दाखल खुनाच्या ३७ गुन्ह्या पैकी ३६ गुन्ह्याची उकल करण्यात पोलीसांना यश आले आहे. तर खुनाचा प्रयत्नाची दाखल ६१ गुन्ह्या पैकी सर्वच्या सर्व गुन्ह्यांची उकल करण्यात लातूर पोलीसांना यश आले आहे. चालू वर्षभरातील व मागील वर्षातील दाखल गुन्ह्याच्या आलेखावर प्रकाश टाकला असता जिल्हा पोलीस अधिक्षक अमोल तांबे यांनी पदभार स्विकारल्या पासून मागच्या वर्षा पेक्षा गुन्ह्यांचा आलेख खालावताना दिसत आहे.

