लातूर : एकमत टीम
रयतेचे राजे, बहूजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती जिल्ह्यात विविध ठिकाणी उत्साहात साजरी करण्यात आली. विविध संस्था, पक्ष,संघटनांच्या वतीने त्यांच्या प्रतिमेचे पूजन करुन अभिवादन केले. जयंतीच्या निमित्ताने विविध उपक्रम राबवून राबविण्यात आले. जयंतीमुळे वातावरण भगवेमय झाले होते. तरुणांत मोठ्या प्रमाणात उत्साह दिसून आला. व्याख्यानांचे विविध ठिकाणी आयोजन करण्यात आले होते.
औराद येथे रक्तदान, दुचाकी रॅली, मिरवणूक
निलंगा तालुक्यातील औराद शहाजानी येथे शिवजयंतीनिमित्त शिवभक्तांनीरक्तदान शिबिर, दुचाकी रॅली व मिरवणूक काढण्यात आली. निलंगा तालुक्यातील औराद शहाजानी येथे छत्रपती शिवाजी महाराज चौक भगवामय करून सजवण्यात आले होते. सर्वप्रथम सकाळी शिवरायांच्या पुतळ्यास अभिवादन करून शहरातून दुचाकी रॅली काढण्यात आली. जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर घेण्यात आले. यात ४७ रक्तदात्यांनी रक्तदान करून सहभाग नोंदवला. सायंकाळी शहरातून शिवरायांच्या प्रतिमेची मिरवणूक छत्रपती शिवाजी महाराज चौकापासून ते मुख्य रस्ता बस स्थानक रोड बालाजी मंदिर मार्केट यार्ड पोलीस ठाणे गांधी चौक, ज्ञानेश्वरी चौक जय भवानी मंदिर या मार्गावरून काढण्यात आली. यावेळी ढोल ताशा ,विविध वेशभूषा केलेली बालके शिवरायांच्या घोषणा देत नागरिक शिवभक्त सहभागी झाले होते यावेळी उपसरपंच महेश भंडारे, बालाजी भंडारे, ग्रामपंचायत सदस्य कन्हैया पाटील, पद्मसिंह पाटील, दिगंबर आंतरेड्डी, शरद भंडारे, शिवाजी शेटगार, सचिन जाधव, योगेश हिरेमठ आदीसह शिवभक्त व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
रेणापूर येथे माजी सैनिकांचा सन्मान सोहळा
छत्रपती शिवाजी महाराज सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीच्या वतीने विविध उपक्रम राबविण्यात आले. बुधवारी दि. १९ रोजी छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावर्षी रेणापूर शहरातील व परिसरातील माजी सैनिकांच्या हस्ते प्रतिमा पुजन करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी माहाराज यांचा पाळणा व देशभक्तीपर गिताने करण्यात आली. यानंतर माजी सैनिक व कु पूर्वी घोडके , कु स्वप्नील कुडके गुणवंत मुलीचा आणि स्पर्धा परिक्षेत यशस्वी झालेल्या मुलींचा जयंती महोत्सव समितीच्या वतीने सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला .
.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अतुल कातळे, निखिल कातळे, किशोर आळंदकर, कृष्णा चव्हाण, गिरीश पाटील, शरद पाटील,परमेश्वर कातळे, अजय गाडे, अमित पाटील, विशाल शिंदे, धीरज शिंदे, शैलेश कातळे, विशाल माने, हनुमंत भालेराव, धनराज भांबरे, खंडू शिंदे,गणेश आळंदकर यांच्या आदिंनी परिश्रम घेतले सूत्रसंचालन प्रा. किशन कुडके यांनी तर आभार अतुल कातळे यांनी मानले.
स्वामी विवेकानंद महाविद्यालय, शिरूर ताजबंद
अहमदपूर तालुक्यातील शिरूर ताजबंद येथील स्वामी विवेकानंद महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभाग, सांस्कृतिक विभाग, इतिहास विभाग तसेच आय. क्यू. ए. सी. विभागाच्या वतीने आयोजित जयंती कार्यक्रमात प्राचार्य डॉ.डी.जी. माने यांच्या हस्ते महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. प्रास्ताविक रासेयो कार्यक्रमाधिकारी डॉ. एस.पी.घायाळ यांनी व्यक्त केले. सूत्रसंचालन डॉ. गोविंद काळे यांनी तर आभार सांस्कृतिक विभागाचे डॉ.नवनाथ पुरी यांनी व्यक्त केले. यावेळी पर्यवेक्षक प्रा.बालाजी सावते, यावेळी समाजशास्त्र अभ्यासमंडळाचे अध्यक्ष डॉ.नारायण कांबळे, प्रा.गंगाधर वडवळे, डॉ. व्यंकट पाटील, डॉ. विलास कांबळे, डॉ. शिवराज पाटील, डॉ. किसन तेलगाणे, प्रा. दत्ता कानवटे, प्रा. शिवशंकर बलशेटवार तसेच प्रा. एजाज पठाण, दीपक गुजराणी, जनार्दन आदटराव, मेघराज शिंदे, नागेश सरवदे आदी उपस्थित होते.