32.9 C
Latur
Wednesday, February 12, 2025
Homeमहाराष्ट्रजीबीएस व्हायरसमुळे मुंबईत पहिला मृत्यू

जीबीएस व्हायरसमुळे मुंबईत पहिला मृत्यू

राज्यात आतापर्यंत ८ जणांचा मृत्यू

मुंबई : प्रतिनिधी
गुलियन बॅरी सिंड्रोमची (जीबीएस) लागण झालेल्या मुंबईतील एका रुग्णाचा मृत्यू झाल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. मनपाच्या नायर रुग्णालयात उपचार सुरू असलेल्या ५३ वर्षीय रुग्णाचा जीबीएस व्हायरसमुळे मृत्यू झाल्याच्या माहितीला खुद्द मनपा आयुक्तांनी दुजोरा दिला आहे. या मृत्यूसह जीबीएसची लागण झाल्याने मृत्यू झालेल्यांचा राज्यातील आकडा आता ८ वर पोहोचला आहे.

गेल्या काही दिवसांपासून पुणे जिल्हा आणि आजूबाजूच्या परिसरात जीबीएसचे रुग्ण सापडल्याने काहीसे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मुंबईत गेल्या शनिवारी या व्हायरसचा पहिला रुग्ण आढळून आला होता. अंधेरी परिसरातील एका ६४ वर्षीय महिलेला जीबीएसची लागण झाल्याचे निष्पन्न झाले होते. राज्यात पुणे जिल्ह्यातच सध्या या व्हायरसचे सर्वाधिक १९७ रुग्ण आढळून आले आहेत. पण आजाराला घाबरण्याची काहीच गरज नाही, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.

जीबीएस संसर्गजन्य नाही
जीबीएस हा आजार संसर्गजन्य नसून नागरिकांनी अजिबात घाबरण्याची गरज नाही असे वैद्यकीय तज्ज्ञांनी सांगितले आहे. या आजाराचा सामना करण्यासाठी मुंबई महापालिकेचा आरोग्य विभाग सज्ज असून व्हेंटिलेटरसह १५० आयसीयू बेड्सची व्यवस्था केली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR