30.5 C
Latur
Saturday, May 31, 2025
Homeमहाराष्ट्रजे झाले ते दुर्दैवी

जे झाले ते दुर्दैवी

बैलासमोर नृत्य केल्याच्या प्रकरणावर गौतमीची प्रतिक्रिया

पुणे : प्रतिनिधी
महाराष्ट्रात वैष्णवी हगवणे प्रकरणात अनेक घडामोडी समोर आल्या आहेत. त्यातच एक म्हणजे दोन वर्षांपूर्वी गौतमी पाटीलने हगवणेंच्या एका कार्यक्रमात डान्स केला होता. हगवणेंच्या बैलाचा वाढदिवस होता आणि गौतमीने बैलासमोर नृत्य सादर केले होते. जे झाले ते दुर्दैवी होते असे म्हणत नुकतीच गौतमी पाटीलने यावर प्रतिक्रिया दिली.

माध्यमांना दिलेल्या मुलाखतीत गौतमी पाटील म्हणाली, जे झाले ते दुर्दैवी होते. मला आपल्या न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे. अजून आरोपी कळलेला नाही. जो असेल त्याला कडक शिक्षा व्हावी. मी वैष्णवीच्या बाजूनेच आहे. मी डान्स केला तो आता व्हायरल होतोय मला वाईटच वाटतंय. ही दु:खाचीच गोष्ट आहे. आम्ही कलाकार आहोत, प्रत्येक गावी जाऊन कार्यक्रम करतो. त्यामुळे कोणाचं पुढे जाऊन काय होईल हे माहीत नसतं. एवढी विचारपूस करणे हे आमचं काम नाही. मी लावणी सादर करते, डान्स करते. आमची मोठी टीम आहे. कोणते काम घ्यायचे हे सगळं माझी मॅनेजमेंट टीम बघते. त्यामुळे मला या गोष्टींबद्दल माहीत नसते.

मला संपूर्ण मानधन मिळाले
यावर गौतमी म्हणाली, मला संपूर्ण मानधन मिळाले होते. कार्यक्रम चांगला झाला होता. सगळं व्यवस्थित झालं होतं. व्हीडीओ आता परत व्हायरल होतोय. मला खरंतर काही माहीत नव्हतं की परत का हे व्हायरल होतंय. मला सगळं नंतर कळलं. पण मी एकच सांगते तुम्हाला कलाकार फक्त कला सादर करतो. त्याला या सगळ्या गोष्टींमध्ये ओढू नका. मी कला सादर केली पुढचं मला काही माहीत नाही.

गौतमीचं ते कामच आहे – अजित पवार
या प्रकरणावर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी मिश्किल उत्तर दिलं होतं. ते म्हणाले की, तुला का वाईट वाटलं…ती बैलासमोर नाचेल किंवा आणखी कोणासमोर नाचेल. तिचं ते कामच आहे. कार्यक्रम करणे हेच तिच्या उपजीविकेचं साधन आहे. बैल काय गायीसमोर नाचू द्या. तिचा तो अधिकार आहे. मी कार्यक्रमात लोकांना सांगितलं की जत्रा सुरू आहे. तर त्यासाठी ग्रामीण भागात वेगवेगळे करमणुकीचे कार्यक्रम सादर होतात. सध्या गौतमीचं नाव गाजतंय तर पाटीलबाईंना त्यांना आणा असं सांगितलं होतं. ज्यांना त्यांची सुपारी परवडत असेल तर त्यांनी आणावं…

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR