निलंगा : प्रतिनिधी
निलंगा शहरासह तालुक्यांमध्ये पुन्हा पावसाने हा हा कार माजविल्याने नद्या, नाले, ओढे, पुले पाण्याखाली गेल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. तेरणा व मांजरा नद्यांच्या प्रवाहात वाढ झाल्याने पुन्हा एकदा पाण्यामध्ये वाढ झाली आहे. यामुळे बॅक वॉटर होऊन अनेक हेक्टर्सवर पाणी साचले आहे. जोरदार झालेल्या पावसाने रस्त्याला तलावाचे रूप येऊन अनेक गावचा संपर्क तुटला आहे. जोरदार झालेल्या पावसाने पिकासह अनेकांच्या घरात व दुकानात पाणी शिरून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तसेच सावनगीरा येथील तलाव फुटल्याची माहिती कळताच उपविभागीय अधिकारी शरद झाडके व तहसीलदार प्रसाद कुलकर्णी यांनी तात्काळ त्या ठिकाणी दाखल होत अक्षरशा हाताला हात धरून पाण्यातून मार्ग काढत तलावाची पाहणी केली. मात्र तो पहिल्यांदाच भरल्याने ओव्हरफ्लो झाल्याचे निदर्शनास आले.
निलंगा शहरासह तालुक्यात पावसाने पुन्हा हाहाकार माजवत जोरदार पाऊस झाल्याने तालुक्यातील नद्या नाले ओढे पुले पाण्याखाली गेल्याने अनेक गावाचा संपर्क तुटला आहे. यात निलंगा कासार शिरशी रोडवरील लिंबाळा, निलंगा ते मदनसुरी, कोकळगाव, हंगरगा, येळनूर, गुंजरगा, सावरी ते माने जवळगा, औराद ते तगरखेडा, गुराळ ते सावनगीरा, हलशी ते तुगाव आदी गावाला जोडणा-या पुलावर व ओढ्यावर पाणी आल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. जोरदार झालेल्या पावसामुळे अनेकांच्या घरात व दुकानात पाणी शिरून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सदर नुकसानीची पाहणी उपविभागीय अधिकारी शरद झाडके व तहसीलदार प्रसाद कुलकर्णी यांनी केली. तसेच तालुक्यातील सावनगीर येथील तलाव पहिल्यांदाच भरून पाणी वाहत असल्याने नागरिकांना फुटल्याचा भास झाला. तलाव फूठल्याची माहिती कळताच सावरी येथे पाहणी करत असलेले उपविभागीय अधिकारी शरद झाडके व तहसीलदार प्रसाद कुलकर्णी तात्काळ सावनगीरा येथे जाऊन अक्षरश: हाताला हात धरून पाण्यातून प्रवास करत तलावाची पाहणी केली असता तो तलाव पहिल्यांदाच भरल्याने ओव्हर फ्लो होऊन वाहत असल्याने नागरिकांना फुटल्यासारखे वाटले. मात्र तो फुटला नसल्याचे निदर्शनास आले.
तसेच झरी येथे जोरदार झालेल्या पावसाने घरात पाणी शिरून जीवनावश्यक वस्तूच्या झालेल्या नुकसानीची पाहणी उपविभागीय अधिकारी शरद झाडके व तहसीलदार प्रसाद कुलकर्णी यांनी केली. तर निलंगा तालुक्यातील औराद शहाजानी सह परिसरातील गावांमध्ये शनिवारी पहाटे झालेला जोरदार पाऊस सकाळी आठ वाजे पर्यंत ६३ मिमी पाऊस झाला. यामुळे परिसरातील अनेक रस्ते जलमय झाले. या भागातून वाहणा-या मांजरा तेरणा नद्याला आलेला पूर शुक्रवारी थोडाफार ओसरला होता. मात्र आज पुन्हा एकदा जोरदार पाऊस व मांजरा तेरणा प्रकल्पातून पाणीसाठा सोडण्यात आल्याने पूरस्थिती वाढली आहे. यामुळे या भागातील औराद तगरखेडा औराद हालसी औराद वांजरखेडा औराद कोंगळी औराद मानेजवळगा सावरी मानेजवळगा या पुलावर ती पाणी साचल्यामुळे या भागातील अनेक गावांचा औराद बाजारपेठेची संपर्क तुटला आहे.