27.5 C
Latur
Friday, October 18, 2024
Homeराष्ट्रीय‘जौनपूर’ ची चर्चा मुंबईपर्यंत

‘जौनपूर’ ची चर्चा मुंबईपर्यंत

जौनपूर : जौनपूरबद्दल असे म्हटले जाते की, प्रत्येक सहाव्या घरातून एक व्यक्ती मुंबईत आहे. त्यामुळे उत्तर प्रदेशातील जौनपूर लोकसभा मतदारसंघाची चर्चा मुंबईपर्यंत आहे. मतदानाचा प्रचार केवळ जौनपूरमध्ये होत नाही, त्यासाठी मुंबईतही प्रचारसभांचे आयोजन करण्यात आले आहे. मतदानाच्या दिवशी मतदारांना जौनपूरला बोलावले जाईल. यासाठी भाजपने विशेष तयारी केली आहे. अनेक संघ जौनपूरच्या लोकांमध्ये लहान-मोठ्या परिषदा घेत आहेत. सुमारे १.२५ लाख मतदारांना आधी अयोध्येत आणले जाईल, त्यानंतर रामलल्लाचे दर्शन घेतल्यानंतर जौनपूरच्या मतदारांना मतदान करायला लावले जाईल.

मुंबईत राहणा-या जौनपूरच्या लोकांची संख्या सुमारे सहा लाख मानली जाते. राजकीय पक्षांसोबतच निवडणूक आयोगाकडूनही लोकांना जास्तीत जास्त मतदान करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. मुंबईत राहणा-या मतदारांना आकर्षित करून त्यांना जौनपूरला आणण्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. भाजपचे उमेदवार कृपाशंकर सिंह म्हणतात की त्यांनी जौनपूरमध्ये राहणा-या अनेक लोकांशी संपर्क साधला आहे. सर्वांशी बोलणे झाले आहे. लोक स्वत: मतदान करण्यासाठी ट्रेनच्या संपूर्ण बोगी बुक करत आहेत.

बसेस बुक केल्या जात आहेत, हा उत्साह खुद्द लोकांमध्ये आहे. तिथे राहणारे लोक सांगतात की ते आधी अयोध्येत प्रभू रामाचे दर्शन घेतील आणि नंतर जौनपूरला जाऊन मतदान करतील. मतदानाच्या दिवशी रामजींचे दर्शन घेण्यासाठी आणि मतदान करण्यासाठी एक ते १.२५ लाख लोक अयोध्येमार्गे जौनपूरला पोहोचतील, अशी अपेक्षा आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR