लातूर : प्रतिनिधी
राज्याचे माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त वारकरी विभाग काँग्रेस सेलच्या वतीने जिल्हाध्यक्ष हभप शरद देशमुख यांच्या नेतृत्वाखाली ज्ञानोबा तुकोबा पायी समता दिंडी निघालेली असून या दिंडीचे गावागावात मोठ्या प्रमाणात स्वागत करण्यात येत असून दहा दिवसापूर्वी या दिंडीचा शुभारंभ लातूर तालुक्यातील मळवटी येथे शुभारंभ करण्यात आला होता. येथून ही दिंडी लातूर तालुक्यांतील विविध गावात गेल्यानंतर मोठ्या प्रमाणात स्थानीक ग्रामस्थांनी अनेक ठिकाणी मंदिर परिसरात भजन कीर्तन करत जल्लोषात दिंडीचे स्वागत होत आहे. उर्वरित २९ गावे व १०० किलोमीटरचा प्रवास येणा-या तीन दिवसात पूर्ण होणार आहे अशी माहिती या दिंडीचे प्रमुख हभप शरद देशमुख यांनी दिली आहे