लातूर : सिध्देश्वर दाताळ
गौरीत्सवाला मंगळवारपासून प्रारंभ झाला असून गौरींचे घरोघरी सोनपावलांनी आगमन झाले आहे. गौरीत्सव म्हणजे फुलांच्या हारासह विविध वस्तंूच्या साहित्याची मोठ्या प्रमाणात रेलचेल असते. बाजारपेठेत गौरीत्सवासाठी आवश्यक असलेल्या सर्वच साहित्य बाजारात गेल्या चार-पाच दिवसांपासून उपलब्ध झाले आहे.
मंगळावारी सायंकाळी घरोघरी गौरींची स्थापना करण्यात आली. आज घरोघरी ज्येष्ठा गौरींचे मनोभावे पुजन होणार आहे. सण, उत्सवाच्या काळात महागाईच्या झळा सामान्य नाकरीकांना सोसाव्या लागतात. काहींही झाले तरी सण तर साजरा करावाच लागत असतो. त्यामुळे काहींप्रमाणात काटकसर करुन सण साजरे केले जात आहेत. या सणासाठी फुलांच्या हाराला मोठी मागणी असते. फुलांच्या किंमतीत काही प्रमाणात वाढ झाली असली तरी बहुतांश जणांनी एक दिवस आधिच फुलांच्या हाराची बुकींग केली असल्याचे व्याप-यांनी सागीतले. शहरातील मुख्य बाजापेठ असलेली गंजगोलाई, हणुमान चौक, सुभास चौक छत्रपती शिवाजी महाराज चौक, औसा रोड, राजीव गांधी चौक आदी भागासह विविध ठिकाणी पुजेच्या साहित्याची दुकाणे थाटली आहेत. या दुकाणावर ज्येष्ठ गौरी पुजेचे साहित्य खरेदीसाठी बाजारात महिला वर्गाची एकच झुंबड उडाली आहे.
शहरातील बाजारपेठेत गेल्या दोन दिवसापासून गौरी पुजेचे साहित्य दाखल झाले आहे. यात १६ भाज्या ३० रूपयांना, मकाचे कणीस १०० रूपयांना ६ नग, नागीनीचे पान ईडी १० रूपयांना, भोपळा ५० ते ७० रूपयांना, हाराळ, आगरडा, सीताफळ, बेल, जांब, आवळा आदी पुजेचे साहित्य ३० ते ५० रूपयांना, खारीक, खोबर, सुपारी, खडीसाखर, हळदीचे खोंब आदी पुजेचे साहित्य ३० ते ४० रूपयांना, हिरवी केळी ६० ते ८० रूपये डजन, जांब १०० रूपये किलो यासह आदी साहित्य बाजारात उपलब्ध झाल्याने महिलांनी खरेदीस गर्दी केली आहे.