27.5 C
Latur
Saturday, April 5, 2025
Homeमनोरंजनज्येष्ठ अभिनेते मनोज कुमार अनंतात विलीन

ज्येष्ठ अभिनेते मनोज कुमार अनंतात विलीन

कलाकारांनी दिला अंतिम निरोप

मुंबई : वृत्तसंस्था
ज्येष्ठ अभिनेते मनोज कुमार यांच्या पार्थिवावर आज सकाळी ११ वाजता पवन हंसमध्ये अन्त्यसंस्कार करण्यात आले. दिवंगत अभिनेते-चित्रपटनिर्माते मनोज कुमार यांच्या निवासस्थानी रुग्णालयातून पार्थिव आणण्यात आले होते. यावेळी त्यांच्या परिवारातील सदस्य, बॉलिवूड जगतातील मंडळी आणि चाहत्यांनी मोठी गर्दी केली होती.

अभिनेते मनोज ‘भरत’ कुमार यांना राजकीय सन्मानात निरोप देण्यात आला. यावेळी अभिनेते अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चन, राजपाल यादव, लेखक सलीम खान, अरबाज खान, संगीतकार-गायक अन्नू मलिक, अभिनेता-निर्माता झायेद खान, अभिनेता प्रेम चोपड़ा, विंदू दारा सिंह, रजा मुराद, धर्मेंद्र, पूनम ढिल्लों शाहरूख खान जड अंत:करणाने उपस्थित होते.

मुंबईतील कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात वयाच्या ८७ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांनी त्यांच्या चित्रपट कारकीर्दीत अनेक देशभक्तीपर चित्रपट केले. म्हणूनच त्यांचे चाहते त्यांना प्रेमाने ‘भारत कुमार’ म्हणत. ते ‘क्रांती’ आणि ‘उपकार’सारख्या देशभक्तीपर चित्रपटांसाठी प्रसिद्ध होते. मनोज कुमार यांच्या निधनाच्या बातमीने चाहत्यांना दु:ख झाले आहे. सोशल मीडियावर, प्रत्येकजण साश्रू नयनांनी त्यांच्या आवडत्या कलाकाराला निरोप देत आहे. ज्येष्ठ अभिनेत्याच्या निधनाबद्दल सेलिब्रिटींनीही शोक व्यक्त केला आहे.

मनोज कुमार यांनी सहारा, चांद, हनिमून, पूरब और पश्चिम, नसीब, मेरी आवाज सुनो, नीलकमल, उपकार, पत्थर के सनम, पिया मिलन की आस, रेशमी रुमाल यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्यांना राष्ट्रीय पुरस्कार, पद्मश्री आणि दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

मनोज कुमार यांनी १९५७ मध्ये ‘फॅशन’ या चित्रपटाद्वारे अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. १९६५ हे वर्ष त्यांच्या कारकीर्दीसाठी एक मोठे परिवर्तनकारी वर्ष होते. या वर्षी प्रदर्शित झालेल्या ‘शहीद’ चित्रपटाने त्यांच्या कारकीर्दीला मोठा फायदा दिला. यानंतर त्यांनी कधीही मागे वळून पाहिले नाही. भूमिका कोणतीही असो, ते तिच्याशी पूर्णपणे जुळवून घेत गेले. मनोज कुमार यांचे चित्रपट केवळ हिट झाले नाहीत तर त्यांची गाणीही लोकांमध्ये लोकप्रिय झाली. ‘उपकार’ या चित्रपटातील ‘मेरे देश की धरती’ हे गाणे प्रत्येकजण आजही गुणगुणतो.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR