पुणे : प्रतिनिधी
जागतिक ख्यातीचे खगोलशास्त्रज्ञ डॉ.जयंत नारळीकर यांच्या पार्थिवावर वैकुंठ स्मशानभूमी येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. शासनाच्या वतीने विभागीय आयुक्त डॉ.चंद्रकांत पुलकुंडवार यांनी त्यांच्या पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली.
उपजिल्हाधिकारी रामहरी भोसले,उपविभागीय अधिकारी पूनम अहिरे,तहसीलदार सूर्यकांत येवले,डॉ.नारळीकर यांचे कुटुंबीय,नातेवाईक तसेच विविध क्षेत्रातील नागरिक उपस्थित होते.तत्पूर्वी डॉ.नारळीकर यांचे पार्थिव आयुका येथून वैकुंठ स्माशनभूमी येथे आणण्यात आले.पोलीस दलाने बंदुकीच्या फैरी झाडून सलामी दिली.
डॉ.नारळीकर यांच्या पार्थिवाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अंत्यदर्शन घेऊन पुष्पचक्र अर्पण केले.आंतर विद्यापीठ खगोलशास्त्र आणि खगोल भौतिकशास्त्र केंद्र (आयुका) येथे पुणे विभागीय आयुक्त डॉ.चंद्रकांत पुलकुंडवार, पुणे शहर पोलीस आयुक्त अमितेश कुमार,पुणे महानगरपालिका आयुक्त डॉ.राजेंद्र भोसले,माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची कुलगुरू डॉ.सुरेश गोसावी आदी उपस्थित होते.