ज्येष्ठ ग्रामीण साहित्यिक हरपला

प्रा. भास्कर चंदनशिव यांचे निधन, लातूरमध्ये सुरू होते उपचार
लातूर : प्रतिनिधी
आभाळ फाटल्याने कधीही न पाहिलेल्या महापुराने अवघ्या मराठवाड्याचा लाल चिखल झाला असतानाच शाळेच्या धड्यातून काळीज चिरणारे मराठवाड्यातील ज्येष्ठ साहित्यिक, ग्रामीण कथाकार प्रा. भास्कर चंदनशिव यांचे आज वृद्धापकाळाने निधन झाले. ग्रामीण साहित्य क्षेत्रात आगळीवेगळी ओळख निर्माण करणारा ज्येष्ठ साहित्यिक हरपल्याने साहित्य क्षेत्राचे मोठे नुकसान झाले आहे.
भास्कर चंदनशिव यांच्यावर गेल्या १५ दिवसांपासून लातूर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. आज रविवारी दुपारी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात पत्नी कमलाबाई, मुलगा कपिल, मुलगी मनिषा, दोन सुना, नाती, नातू, जावई, असा मोठा परिवार आहे. भास्कर चंदनशिव हे मराठवाडा साहित्य परिषदेच्या २०११ च्या एप्रिलमध्ये केज (जि. बीड) येथे झालेल्या पहिल्या ग्रामीण साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. २०१२ मध्ये पळसप (जि. धाराशिव) येथे झालेल्या एकदिवसीय मराठवाडा ग्रामीण साहित्य संमेलनाचेही ते अध्यक्ष होते.
भास्कर चंदनशिव हे मूळचे धाराशिव जिल्ह्यातील रहिवासी होते. त्यांचा जन्म १२ जानेवारी १९४५ रोजी हासेगाव (ता. कळंब) येथे झाला. त्यांचे मूळ नाव भास्कर देवराव यादव होते. दत्तकपुत्र असल्याने भास्कर तात्याबा चंदनशिव म्हणून त्यांची ओळख झाली. शालेय शिक्षण जिल्हा परिषद शाळा कळंबमध्ये झाले. अंबाजोगाईत बीए पूर्ण केले. छत्रपती संभाजीनगरला मराठी विषयातून एम. ए. केले. जून १९७२ मध्ये वरिष्ठ महाविद्यालयात मराठीचे प्राध्यापक म्हणून नोकरीस प्रारंभ केला. त्यांनी वैजापूर येथे नोकरी केली. बलभीम महाविद्यालय बीड येथून २००५ मध्ये ते सेवानिवृत्त झाल्यानंतर कळंबला स्थायिक झाले.
वयाच्या विसाव्या वर्षी भास्कर चंदनशिव यांनी कथालेखनास प्रारंभ केला. त्यांच्या साहित्यकृतीत सातत्याने ग्रामीण भागातील शेतकरी, सामान्य नागरिक नायकाच्या रूपाने वाचकांच्या समोर येतो. चंदनशिव यांच्या ‘जांभळढव्ह’, ‘मरणकळा’, ‘अंगारमाती’, ‘बिरडं’, ‘नवी वारुळं’ या कथासंग्रहांचा आवर्जून उल्लेख केला जातो.
साहित्यसंपदा
कथासंग्रह
जांभळढव्ह (१९८०), मरणकळा (१९८३), अंगारमाती (१९९१), नवी वारुळ (१९९२), बिरडं (१९९९)

-ललितलेख संग्रह : रानसई
-समीक्षा ग्रंथ : भूमी आणि भूमिका, माती आणि नाती, माती आणि मंथन
संपादन : ज्योती म्हणे, गाथा, सगनभाऊंच्या लावण्या इत्यादी

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम केले फेल

उत्तर गाजा : पेजर आणि वॉकी टॉकी मध्ये केमिकल...

नाशिकमध्ये भाजपला भगदाड!

नाशिक : प्रतिनिधी नाशिकमध्ये भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का बसला...

निवडणुकीचे विविध साहित्य, सामग्रीचे दर निश्चित

लातूर : प्रतिनिधी विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत विविध राजकीय पक्ष, उमेदवार...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Nanded|काँग्रेसचा उमेदवार असता तर माघार घेतली असती; उबाठाला जागा सुटल्याने निवडणूक लढणार– इंगोले
01:20
Video thumbnail
जळकोट तालुक्यात वादळी वाऱ्यासह मान्सूनपूर्व पावसाची हजेरी; वातावरणात पसरला गारवा
00:49
Video thumbnail
Latur|आमदार पुत्र ऋषिकेश कराड यांच्यावर जमीन खोदल्याचा आरोप; शेतकऱ्याची पोलीस अधीक्षकांकडे तक्रार!
05:03
Video thumbnail
Nanded|प्रवीण पाटील चिखलीकर यांची विधान परिषद निवडणुकीतून माघार
08:45
Video thumbnail
Nanded|नांदेड विधान परिषद निवडणुकीतून माधवराव पाटील जवळगावकर यांची माघार
02:21
Video thumbnail
Nanded|अर्धापुरात दमदार पावसाची हजेरी; उकाड्यापासून नागरिकांना दिलासा
01:16
Video thumbnail
Latur|भूकंपग्रस्ताची तहसीलदारांकडून हेळसांड? न्यायासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात ठिय्या
01:38
Video thumbnail
Latur|अहिल्यादेवी जयंती न साजरी केल्याने ग्रामसेवकांवर कारवाईची टांगती तलवार
03:57
Video thumbnail
RCC CLASSES|फी परत करा, परवाना रद्द करा; RCC विरोधात हजारोंच्या आंदोलनाचा इशारा
01:27
Video thumbnail
सोलापुरात विषारी मद्यविरोधात प्रशासनाची धडक कारवाई; २४ लाखांचा मुद्देमाल जप्त, ‘झिरो टॉलरन्स’चे धोरण
03:08
Video thumbnail
मोहोळ-वैराग रस्ता रुंदीकरण: मोबदल्याशिवाय काम नको! बाधित शेतकऱ्यांचा तीव्र विरोध; हायकोर्टात धाव
02:23
Video thumbnail
Latur|तहसीलदारांसमोरच अंगावर पेट्रोल ओतल्याने खळबळ;पाच महिन्यांपासून प्रकरण प्रलंबित असल्याचा आरोप
01:56
Video thumbnail
Shivraj Motegavkar|कुलकर्णीच्या प्रॉपर्टीवर बुलडोजर;मोटेगावकरच्या इमारतीवर कारवाई कधी?"
02:48
Video thumbnail
Latur Airport|लातूर विमानतळ विकासाला गती; उद्योग-पर्यटन क्षेत्राला मोठा फायदा
03:39
Video thumbnail
Latur|लातूरमध्ये भोंदूबाबाचा भांडाफोड;खोपेगावातील कथित बाबाचा दरबार बंद
03:01

Latest news