मुंबई : वृत्तसंस्था
दिग्गज क्रिकेटर झहीर खान आणि त्याची पत्नी, अभिनेत्री सागरिका घाटगे यांच्या घरी पाळणा हलला आहे. त्यांनी बाळाचे स्वागत केले असून मुलाचे नावदेखील ठेवले आहे. बुधवारी (१६ एप्रिल) सकाळी सागरिका आणि झहीर यांनी सोशल मीडियावर एक सुंदर ब्लॅक अँड व्हाईट फोटो शेअर करत ही गुड न्यूज दिली.
या कपलने बुधवारी एक पोस्ट शेअर करून ही गुड न्यूज दिली. कपलने फोटो शेअर केले असून त्यामध्ये झहीरने बाळाला कुशीत घेतले आहे. तर सागरिकाने झहीरच्या खांद्यावर हात ठेवला आहे. आणखी एका फोटोमध्ये झहीरने बाळाचा हात धरला आहे. त्यांनी मुलाचे नाव ‘फतेहसिंह खान’ ठेवले आहे.
त्यांनी इन्स्टाग्राम पोस्ट शेअर करत लिहिलंय. सागरिकाच्या या पोस्टवर सेलेब्स आणि चाहते अभिनंदनाचा वर्षाव करत आहेत.
दोघांनी २०१७ मध्ये लग्न केले. हा खासगी विवाह सोहळा होता. पण नंतर त्यांनी मुंबईमध्ये ग्रँड रिसेप्शन देखील दिले होते.
सागरिका आणि झहीरची ओळख अंगद बेदी आणि इतर काही मित्रांमुळे झाली होती. त्यानंतर दोघांनी जवळपास दीड वर्ष एकमेकांना डेट केले. त्यानंतर २०१७ मध्ये लग्न केले. सागरिकाने पहिल्यांदा मॉडेल म्हणूनही काम केले.