22.4 C
Latur
Monday, September 16, 2024
Homeराष्ट्रीयझारखंडमध्ये रेल्वेने १२ प्रवाशांना चिरडले

झारखंडमध्ये रेल्वेने १२ प्रवाशांना चिरडले

आग लागल्याने मारल्या उड्या, समोरून येणा-या रेल्वेने चिरडले

जामतारा : वृत्तसंस्था
झारखंडमधील जामतारा येथे रेल्वेचा भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत १२ जणांचा मृत्यू झाला असून अनेकजण गंभीररित्या जखमी झाले आहेत. घटनास्थळी पोलिस आणि प्रशासनाची एक टीम दाखल झाली. त्यानंतर बचावकार्य सुरू करण्यात आले. ही घटना करमाटांड जवळ कालाझरिया येथे घडली. एक्स्प्रेस ट्रेनमध्ये आग लागल्यानंतर प्रवाशांमध्ये एकच खळबळ माजली. लोक रेल्वेमधून बाहेर उड्या टाकू लागले. याचवेळी समोरून येणा-या झाझा-आसनसोल रेल्वेने ट्रॅकवर पडलेल्या प्रवाशांना चिरडले. या दुर्घटनेत १२ जणांचा मृत्यू झाला.

दरम्यान, लाईनच्या बाजूला टाकलेल्या गिट्टीची धूळ उडत होती. मात्र, धूळ पाहून गाडीला आग लागल्याचे आणि धूर निघत असल्याचे चालकाच्या लक्षात आले. त्यामुळे प्रवाशीही ट्रेनमधून लगेच उतरले. त्यांना रेल्वे कर्मचा-यांनी थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र, मार्गावर जाणा-या ट्रेनची धडक बसून अनेक प्रवाशांचा मृत्यू झाला.

दरम्यान, चेन ओढल्याने रेल्वे थांबवण्यात आले होती. त्यानंतर काही लोक रेल्वे ट्रॅक पार करण्याचा प्रयत्न करत होते. याचवेळी समोरून येणा-या रेल्वेने प्रवाशांना धडक दिली. यात १२ जणांचा बळी गेला तर दोन लोक गंभीर जखमी असल्याचे सांगण्यात आले. त्यातच वैद्यकीय पथके आणि रुग्णवाहिका घटनास्थळी पोहोचल्या आहेत. बचावकार्य सुरु करण्यात आले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR