27.7 C
Latur
Wednesday, July 3, 2024
Homeमहाराष्ट्र‘झिका’चा आणखी एक रुग्ण सापडला; एकूण रुग्णसंख्या चार

‘झिका’चा आणखी एक रुग्ण सापडला; एकूण रुग्णसंख्या चार

पुणे : प्रतिनिधी
पुण्यात ‘झिका’चा आणखी एक रुग्ण पॉझिटिव्ह आला असून, आता एकूण रुग्णांची संख्या चार झाली आहे. मुंढवा येथे एका ४७ वर्षांच्या महिलेला झिका झाला होता. तिचा अहवाल १ जून रोजी खासगी प्रयोगशाळेत पॉझिटिव्ह आला होता. आता तिच्याच मुलाचा अहवाल शुक्रवारी पॉझिटिव्ह आला आहे. त्याची तब्येत स्थिर असल्याची माहिती महापालिकेच्या प्रभारी आरोग्य प्रमुख डॉ. कल्पना बळवंत यांनी दिली.

याआधी एरंडवणे येथे एक डॉक्टर आणि त्याची १५ वर्षांची मुलगी असे दोन रुग्ण ‘झिका’साठी पॉझिटिव्ह आले होते. त्यानंतर मुंढवा येथे महिला पॉझिटिव्ह आल्याची माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाला मिळाली. आता त्या कुटुंबातील सदस्यांचे नमुने तपासणीसाठी राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेकडे पाठवले असता तिच्या मुलालादेखील लागण झाल्याचे समोर आले आहे. दरम्यान, ‘झिका’मुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये. सर्वसामान्य नागरिक आणि खास करून गर्भवती महिलांनी डासांपासून काळजी घ्यावी, असे अवाहन करण्यात आले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR