21.3 C
Latur
Sunday, February 1, 2026
Homeलातूरटक्केवारी आणि कमिशनखोरीचा धंदा आता बंद करा

टक्केवारी आणि कमिशनखोरीचा धंदा आता बंद करा

उदगीर : प्रतिनिधी
उदगीर आणि जळकोट परिसरात हजारो कोटी रुपयांचा निधी आणल्याच्या गप्पा मारल्या जातात, मात्र प्रत्यक्षात जमिनीवर कामे दिसत नाहीत. येथे केवळ टक्केवारी आणि कमिशनखोरीचा खेळ सुरू असून, सरकारी योजनांचा लाभ सामान्य जनतेऐवजी केवळ कंत्राटदार आणि लोकप्रतिनिधींच्या खिशात जात आहे. ही परिस्थिती बदलण्यासाठी आणि जिल्हा परिषदेत पारदर्शक प्रशासन आणण्यासाठी काँग्रेस आघाडीला विजयी करा, असे आवाहन माजी मंत्री, आमदार अमित विलासराव देशमुख यांनी केले.
लातूर जिल्हा परिषद निवडणूक आणि उदगीर पंचायत समिती निवडणुकीच्या संदर्भाने सोमनाथपूर जिल्हा परिषद गटातील उमेदवार जयश्री मनोहर तोंडारे, गुडसूर पंचायत समिती गणातील उमेदवार सुनीता राहुल घोणसे व सोमनाथपूर पंचायत समिती गणातील उमेदवार छायाबाई बालाजी हैबतपुरे, तसेच लोहारा मतदारसंघातील उमेदवार यांच्या प्रचारार्थ  दि. ३१ जानेवारी रोजी दुपारी उदगीर तालुक्यातील लोणी येथील हनुमान मंदिर चौकात काँग्रेस आघाडी उमेदवारांच्या प्रचारार्थ जाहीर सभा झाली. त्याप्रसंगी माजी मंत्री, आमदार अमित देशमुख बोलत होत.
यावेळी  उदगीर काँग्रेस प्रभारी श्रावण रॅपनवाड, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते बसवराज पाटील नागराळकर, शिवाजीराव हुडे, कल्याण पाटील संतोष बिरादार, विनोबा पाटील, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे  उदगीर तालुकाध्यक्ष प्रशांत मोरे, शिलाताई पाटील, पद्माकर उगीले, चंदन पाटील नागराळकर, मंजुरखा पठाण, रा.स.प. जिल्हाध्यक्ष नागनाथ बोडके, सोनू पिंपरे, राजेंद्र पाटील, विवेक जाधव तोगरी जिल्हा परिषद गटाचे काँग्रेस आघाडीचे उमेदवार शिवाजीराव मुळे,  मधुकरराव एकरगेकर, लोहारा जिल्हा परिषद गटाचे काँग्रेस आघाडीचे उमेदवार मुकेश भालेराव, संध्याताई पटवारी, आशिष पाटील, उत्तम पाटील, लक्ष्मण पटवारी, सुभाष कावर, बबन फड, नागनाथ सोलापूरे, नरसिंग कांबळे, वैजनाथ बिराजदार, अजीज मौलाना, जिल्हा परिषद गट सोमनाथपूर काँग्रेस आघाडी उमेदवार जयश्री मनोहर तोंडारे, पंचायत समिती गण सोमनाथपुर काँग्रेस आघाडी उमेदवार छायाबाई बालाजी हैबतपुरे, गुडसूर काँग्रेस आघाडी उमेदवार सुनिता राहुल घोनसे आदिसह काँग्रेस आघाडीचे विविध पदाधिकारी कार्यकर्ते मतदार बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या प्रचार सभेचा शुभारंभ माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख व मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला.  पूढे बोलतांना माजी मंत्री, आमदार अमित विलासराव देशमुख म्हणाले, उदगीर आणि जळकोट परिसरात हजरो कोटी रुपयांचा निधी आणल्याचे येथील लोकप्रतिनिधी सांगतात परंतु त्या योजना राबवल्याचे कुठेच दिसत नाही. इथे फक्त टक्केवारीचा खेळ चालतो असे लोकच सांगताहेत, त्यामुळे येथे येणा-या योजना आणि निधी फक्त गुत्तेदार आणि पर्यायाने लोकप्रतिनिधीसाठीच राबवल्या  जात आहेत. त्यामुळे आपणाला ही परिस्थिती बदलायची आहे, शासनाच्या योजना लोकांसाठी राबवायच्या असतील, दर्जेदार कामे करायची असतील तर, समाजाशी बांधिलकी असलेला काँग्रेस पक्ष आणि त्या पक्षाचे लोकाभिमुख उमेदवार निवडून येणे आवश्यक असल्याचे यावेळी बोलताना सांगितले. लातूर जिल्हा परिषद आणि उदगीर पंचायत समितीमध्ये, भ्रष्टाचारमुक्त पारदर्शक गतिमान प्रशासन निर्माण करण्यासाठी या निवडणुकीत काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांना प्रचंड मताधिक्याने विजयी करावे, असे आवाहनही यावेळी बोलतांना आमदार देशमुख यांनी केले.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते बसवराज पाटील नागराळकर  म्हणाले की, भारतीय जनता पक्षाने माणसात माणूस ठेवला नाही. भारतीय संविधानाने देश चालला पाहिजे. सध्या महागाई प्रचंड प्रमाणात वाढली आहे. आपल्या देशातील लोकशाही टिकली पाहिजे. केंद्रातील सत्ताधारी भाजप सरकार भारतीय न्यायव्यवस्था बदलण्याचा प्रयत्न करत आहेत. लातूर शहर महानगरपालिकेत काँग्रेसची सत्ता आली. त्यामुळे आता लातूर जिल्हा परिषद व जिल्ह्यातील सर्व पंचायत समितीमध्ये काँग्रेस आघाडीची सत्ता येणार आहे.
त्यामुळे सर्वांनी माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांच्या पाठीमागे उभे राहावे, असे सांगून येत्या ७ तारखेला काँग्रेस आघाडीच्या सर्व जिल्हा परिषद गट व सर्व पंचायत समिती गणातील उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करावे, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी कल्याण पाटील, शिवाजीराव हुडे, पद्माकर उगीले यांनी मनोगत व्यक्त करून काँग्रेस आघाडीच्या सर्व जिल्हा परिषद गट व सर्व पंचायत समिती गणातील उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करावे, असे आवाहन केले. सूत्रसंचालन अमजद पठाण यांनी केले तर आभार विवेक जाधव यांनी मानले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR