इस्लामाबाद : जम्मू-काश्मीर येथील पहलगाम येथे झालेल्या हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाला. या प्रकरणी आता एनआयएने तपास सुरू केला आहे. या हल्ल्याची जबाबदारी टीआरएफने घेतली होती. दरम्यान, पाकिस्तानचे उपपंतप्रधान आणि परराष्ट्र मंत्री इशाक दार यांनी पाकिस्तानी संसदेत पहलगाम दहशतवादी हल्ल्यासाठी जबाबदार असलेल्या दहशतवादी संघटनेचे नाव संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या ठरावातून काढून टाकल्याचे कबूल केले आहे.
टीआरएफ ही लष्कर-ए-तैयबाशी संबंधीत एक दहशतवादी संघटना आहे. टीआरएफने पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. पहलगाम हल्ल्यासाठी भारताने टीआरएफवर आरोप केला नव्हता, तर सर्वात आधी टीआरएफने स्वत: हल्ल्याची जबाबदारी घेतली.
जम्मू-काश्मीर येथील पहलगाम येथे झालेल्या हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाला. या प्रकरणी आता एनआयएने तपास सुरू केला आहे. या हल्ल्याची जबाबदारी टीआरएफने घेतली होती. दरम्यान, पाकिस्तानचे उपपंतप्रधान आणि परराष्ट्र मंत्री इशाक दार यांनी पाकिस्तानी संसदेत पहलगाम दहशतवादी हल्ल्यासाठी जबाबदार असलेल्या दहशतवादी संघटनेचे नाव संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या ठरावातून काढून टाकल्याचे कबूल केले आहे.