23.6 C
Latur
Saturday, October 5, 2024
Homeक्रीडाटीम इंडियाचा शानदार विजय

टीम इंडियाचा शानदार विजय

हरारे : वृत्तसंस्था
अभिषेक शर्माने धडाकेबाज शतक, त्याला ऋतुराज गायकवाडची मिळालेली साथ आणि रिंकू सिंगच्या तुफानी फटकेबाजी याच्या जोरावर भारताने झिम्बाब्वेविरुद्ध शानदार विजय साकारला.
दुस-या टी-२० सामन्यात दमदार फटकेबाजीच्या जोरावर भारताने २३४ धावा उभारल्या होत्या. त्यावेळीच भारताने विजयाचा भक्कम पाया रचला होता. झिम्बाब्वेचा संघ जेव्हा २३५ धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरला, तेव्हा भारताने पहिल्या षटकांपासून त्यांना धक्के द्यायला सुरुवात केली. त्यामुळे भारताने या सामन्यात झिम्बाब्वेवर सहजपणे विजय मिळवला. या विजयासह भारताने पहिल्या सामन्यातील पराभवाचा बदला घेतला. त्याचबरोबर भारतीय संघाने मालिकेत १-१ अशी बरोबरी केली. भारताने यावेळी १०० धावांनी झिम्बाब्वेवर विजय साकारला.

भारताला कर्णधार शुभमन गिलच्या रुपात सुरुवातीलाच धक्का बसला. गिलला यावेळी २ धावा करता आल्या. पण त्यानंतर मैदानात अभिषेक आणि ऋतुराज यांनी धमाकेदार फटकेबाजी केली. या दोघांनी झिम्बाब्वेच्या गोलंदाजीचा चांगलाच समाचार घेतला. त्यामुळे भारताला झिम्बाब्वेला बॅकफूटवर ढकलता आले. अभिषेक आणि ऋतुराज यांनी दुस-या विकेटसाठी १३६ धावांची भागीदारी रचली. पण ही जोडी फुटली जेव्हा अभिषेक बाद झाला.

अभिषेक शर्माचे शतक
भारताकडून शुभमन गिल फारशी चांगली कामगिरी करू शकला नाही. मात्र, त्यानंतर अभिषेक शर्मा आणि ऋतुराज गायकवाडने जोरदार फटकेबाजी केली. अभिषेक शर्माने अवघ्या ४७ चेंडूत १०० धावा केल्या. ऋतुराज गायकवाड ७७ तर रिंकू सिंगने ४८ धावा केल्या. या तिघांच्या कामगिरीच्या जोरावर भारताने २३४ धावांचा डोंगर रचला. आज साई सुदर्शनने भारताकडून आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये पदार्पण केले.

मालिकेत बरोबरी
भारत आणि झिम्बॉब्वे यांच्यात पाच सामन्यांची टी-२० मालिका सुरु आहे. भारताला पहिल्या टी-२० मॅचमध्ये १३ धावांनी पराभव स्वीकारावा लागला. फलंदाज आणि गोलंदाजांच्या दमदार कामगिरीच्या जोरावर भारताने आजच्या मॅचमध्ये कमबॅक केले. भारताने दुस-या टी-२० सामन्यातील विजयासह मालिकेत बरोबरी केली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR