टीसीएस धर्मांतरण प्रकरण; ‘एमआयएम’ नगरसेवकाला जामीन

नाशिक : प्रतिनिधी
नाशिकच्या टीसीएस धर्मांतरण प्रकरणातील टीसीएस कंपनीतील एचआर एक्झिक्यूटिव्ह निदा खान हिच्या जामिनाला सातत्याने विरोध केला जात आहे. त्यामुळे गर्भवती असूनही तिच्या जामीनात विदेशी अडथळे निर्माण झाले होते. या पार्श्वभूमीवर नाशिकच्या न्यायालयाने एमआयएमचे नगरसेवक मतीन पटेल यांना जामीन मंजूर केला आहे.

संशयित निदा खान हिला आश्रय दिल्याचा छ. संभाजीनगर येथील नगरसेवक मतीन पटेल यांच्यावर आरोप होता. त्यामुळे नाशिक पोलिसांनी त्यांना नोटीस बजावली होती. नोटीस बजावल्यानंतर ते न्यायालयात गैरहजर राहिले होते. या न्यायालयीन नोटीसीनंतर गैरहजर राहिल्याने नगरसेवक पटेल याला पोलिसांनी ताब्यात घेतले होते. या पार्श्वभूमीवर त्याला न्यायालयात हजर करण्यात आले. त्यानंतर मूळ गुन्ह्यात आरोपी नसल्याने त्याला न्यायालयाने सोमवारी जामीन मंजूर केला.

हिंदुत्ववादी संघटनांनी टीसीएस प्रकरणावर गंभीर आरोप केले होते. यातील सात आरोपींना पोलिसांनी अटक केली. नंतर कंपनीने या कर्मचा-यांना चौकशीसाठी निलंबित केले होते.

या पार्श्वभूमीवर नगरसेवक पटेल याला न्यायालयाने ७५ हजार रुपयांचा जात मुचलका आणि तेवढ्याच रकमेच्या दोन व्यक्तींच्या जामीनावर मुक्त केले. त्यासाठी विविध अटी आहेत. यातील साक्षीदारांवर कोणताही दबाव आणू नये. संशयिताने न्यायालयाच्या सुनावणीला नियमितपणे उपस्थित रहावे, असे न्यायालयाने स्पष्ट केले.

यापुढे चौकशीसाठी पोलिसांना गरज भासल्यास नोटीस बजावून नगरसेवक पटेल याला चौकशीसाठी बोलाविण्यात येईल. त्याबाबत पोलिसांना सहकार्य करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. त्यामुळे या प्रकरणातील संशयीताला जामीन मिळाल्याने खटल्यातील ती महत्त्वाची घटना ठरली आहे.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Nanded|नांदेड बसस्थानक परिसरात एसटी बसची धडक; महिलेचा जागीच मृत्यू
00:34
Video thumbnail
Nanded|महापुराला वर्ष झालं, आश्वासनांचं काय? हसनाळचे गावकरी थेट नदीत उतरले!
01:04
Video thumbnail
Latur|श्रीमती वैशालीताई देशमुख यांच्या हस्ते रुपाली फॅशन स्टुडिओचे दिमाखात उद्घाटन
04:06
Video thumbnail
LIVE-लोकनेते विलासरावजी देशमुख यांच्या स्मृतिदिनाच्या निमित्ताने विनम्र अभिवादन
29:29
Video thumbnail
Latur|लातूरकरांसाठी मोठी आरोग्यसुविधा! बी. व्ही. काळे रुग्णालयात तपासणी-उपचार मोफत
02:42
Video thumbnail
Latur|लातूरकरांसाठी मोठी आरोग्यसुविधा! शिवपुजे हॉस्पिटलमध्ये हृदयरोग तपासणी मोफत
01:05
Video thumbnail
Latur|लोकनेते विलासराव देशमुखांच्या स्मृतींना आदरांजली;पोदार हॉस्पिटलमध्ये मोफत अस्थीरोग शिबिर
02:13
Video thumbnail
Latur|लोकनेते विलासराव देशमुख स्मृतिदिनानिमित्त बरमदे हॉस्पिटलमध्ये सर्व तपासण्या मोफत
02:07
Video thumbnail
Latur|लोकनेते विलासराव देशमुखांच्या स्मृतींना आरोग्यसेवेतून आदरांजली
02:35
Video thumbnail
Latur|लोकनेते विलासरावजी देशमुखांच्या स्मृतिदिनी बाभळगावात जनसागर!
01:01
Video thumbnail
Latur|हरंगुळ पेटलं! प्रदूषण आणि अवैध धंद्यांविरोधात ग्रामस्थ आक्रमक
03:59
Video thumbnail
Latur|लोकनेते विलासरावजी देशमुख यांच्या स्मृतिदिनानिमित्ताने अनोखी आदरांजली;लातुरात महाआरोग्य शिबिर
03:52
Video thumbnail
Latur|धक्कादायक! ट्रक-ऑटोच्या धडकेत एकाचा मृत्यू
01:03
Video thumbnail
Latur|माजी सरपंच धनंजय देशमुख यांची मोठी भूमिका; म्हणाले—“परवाना रद्द करण्यासाठी पाठपुरावा करणार
06:26
Video thumbnail
जळकोटच्या आठवडी बाजारात भाजीपाला स्वस्त; खरेदीसाठी ग्राहकांची मोठी गर्दी
02:02

Latest news