23.1 C
Latur
Thursday, September 18, 2025
Homeअंतरराष्ट्रीयटॅरिफचा तुघलकी निर्णय अंगलट; डॉलर घसरला!

टॅरिफचा तुघलकी निर्णय अंगलट; डॉलर घसरला!

मार्केट वॉच । ट्रम्प टेन्शनमध्ये; युरो, भारतीय रुपया आणि येनमध्ये सुधारणा; मंदी वाढली, जीडीपी घसरला

वॉशिंग्टन : वृत्तसंस्था
अमेरिकेने जसा भारतावर टॅरिफ लावला तसाच तो चीन आणि इतर देशांवर देखील लावला आहे. या टॅरिफचे परिणाम आता समोर येऊ लागले आहेत. याचा मोठा फटका आता अमेरिकेला बसला असून, ट्रम्प यांचे टेन्शन वाढले आहे.

डॉलर ही जगातील सर्वात मजबूत करन्सी म्हणून ओळखली जाते, मात्र टॅरिफनंतर सातत्यानं डॉलरमध्ये घसरण सुरू असल्याचं पहायला मिळत आहे. गेले ७२ दिवस म्हणजे तब्बल दहा आठवडे डॉलरमध्ये घसरण सुरू आहे. अमेरिकेचं टॅरिफ धोरण, जपान आणि युरोपीयन चलनाची वाढलेली किंमत, अशा अनेक कारणांमुळे सध्या डॉलरमध्ये घसरण सुरू आहे.

दुसरीकडे भारतीय रुपयाच्या घसरणीला सध्यातरी ब्रेक लागला असून, गेल्या दोन दिवसांपासून डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयामध्ये सुधारणा दिसून येत आहे. दरम्यान पुढील काही दिवस डॉलरमधील घसरण अशीच सुरू राहणार असून, त्याचा मोठा फटका हा अमेरिकेला बसू शकतो असा अंदाज सध्या अर्थतज्ज्ञांकडून वर्तवण्यात येत आहे. जर फेडरल रिझर्व्हने रेपो रेट ३५ ते ५० बेसिस पॉइंटने कमी केला तर अमेरिकन डॉलरमध्ये आणखी घसरण पहायला मिळण्याची शक्यता आहे.

‘मार्केट वॉच’च्या डाटा नुसार डॉलरचा इंडेक्स ९६.९३ पोहोचला आहे. ‘फॅक्ससेट’च्या आकडेवारीनुसार डॉलर आपले प्रमुख प्रतिस्पर्धी चलन असलेल्या युरो, आणि येनच्या तुलनेत ०.५ टक्क्यांनी घसरला आहे. पुढील काळामध्ये डॉलरमध्ये ०.२५ टक्क्यांपर्यंत घसरण पहायला मिळू शकते असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

भारतीय रुपया मजबूत स्थितीमध्ये
दरम्यान, रुपयामध्ये देखील घसरण सुरू होती, मात्र गेल्या दोन दिवसांपासून या घसरणीला ब्रेक लागला असून, भारतीय रुपयाच्या स्थितीत सुधारणा होत आहे. गेले दोन दिवस डॉलरच्या तुलनेमध्ये रुपयाच्या मुल्यामध्ये वाढ झाली असून, रुपया प्रति डॉलर ८७.५० जवळपास पोहोचला आहे. हा अमेरिकेसाठी मोठा झटका मानला जात आहे.

मंदीमुळे नोकरी वाढीचा वेग मंदावला
फेडरल रिझर्व्हचे अध्यक्ष जेरोम पॉवेल यांनी अमेरिकेतील सध्याच्या परिस्थितीला टॅरिफ कारणीभूत असल्याचा आरोप केला. नोक-यांवर मंदी आहे आणि अनेकांच्या नोक-या देखील गेल्याचे त्यांनी म्हटले. नोकरी वाढीचा वेग मंदावला आहे. नोक-यांवरील धोका वाढला आहे.

अमेरिकी जीडीपी घसरला
वर्षाच्या पहिल्या सहामाहीत जीडीपी सुमारे १.५% दराने वाढला, जो गेल्या वर्षीच्या तुलनेत २.५% पेक्षा कमी आहे. आता डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतलेला टॅरिफचा निर्णय हा त्यांच्यावरच उलट पडताना दिसत आहे. सगळ्या बाजूंनी त्यांच्यावर आरोप केले जात आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR