25.7 C
Latur
Tuesday, August 12, 2025
Homeउद्योगटेस्लाच्या साता-यातील प्रकल्पाला अखेर ‘खो’

टेस्लाच्या साता-यातील प्रकल्पाला अखेर ‘खो’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
एलन मस्क यांच्या नेतृत्वाखालील इलेक्ट्रिक वाहन (ईव्ही) निर्माती कंपनी टेस्ला भारतात आपल्या वाहनांच्या उत्पादनास तयार नाही तर त्यांना देशात केवळ शोरूम उघडायची आहेत, असे केंद्रीय अवजड उद्योग मंत्री एच. डी. कुमारस्वामी यांनी सोमवारी स्पष्ट केले. अमेरिकेतील कर चुकवण्यासाठी टेस्ला भारतात उत्पादन करणार असेल तर ते योग्य नाही, असे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले होते. याकडे मंत्र्यांनी लक्ष वेधले. साता-­यात या प्रकल्पासाठी कंपनीकडून जागा शोधत असल्याचे सरकारी अधिका-यांनी जाहीर केले होते.

टेस्ला ही ईव्ही कंपनी भारतात आपली वाहने विकण्यास इच्छुक आहे. पण ती इथे उत्पादन सुरू करू इच्छित नाही. ते फक्त शोरूम सुरू करण्यास अधिक इच्छुक आहेत, असे कुमारस्वामी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

टेस्ला भारतात उत्पादन युनिट उभारण्यास उत्सुक नसताना, मर्सिडीज-बेंझ, स्कोडा-फोक्सवॅगन, ुंदाई आणि किया या कंपन्यांनी भारतात इलेक्ट्रिक वाहने तयार करण्यास रस दाखवला आहे. सरकार आणि वाहन कंपन्यांमध्ये भारतात इलेक्ट्रिक वाहने उत्पादन करणा-यास चालना देण्यासाठी घेतलेल्या बैठकीत वरील चार कंपन्यांनी स्वारस्य दाखवले आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR