16.1 C
Latur
Wednesday, December 3, 2025
Homeलातूरट्रकचे चाक डोक्यावरून गेल्याने महिला जागीच ठार

ट्रकचे चाक डोक्यावरून गेल्याने महिला जागीच ठार

रेणापूर : प्रतिनिधी
भरधाव ट्रकची धडक लागून टायरखाली आल्याने डोक्याचा चेंदामेंदा होऊन ३५ वर्षीय महिलेचा जागीच मृत्यू झाल्याची घटना पिंपळफाटा (रेणापूर)  येथे मंगळवारी (दि .२ ) सकाळी ९.२० वाजण्याच्या  सुमारास घडली.
पिंपळफाटा रेणापूर येथील नरसिंह चौकात सकाळी ९ वाजण्याच्या  सुमारास  अंबाजोगाईहून रेणापूर मार्गे तेलंगणा राज्यात जाणारा ट्रक क्रमांक ए.पी. ३९ टी ३७८६ भरधाव वेगाने जात होता. त्यातच नरसिंह चौकात मयत महिला  आरेपून दसीम शेख हल्ली मुक्काम  (कोळगाव ता. रेणापूर) वय वर्ष ३५ ही बसची वाट बघत थांबली होती. त्या दिशेनेच वरील क्रमांकाचा ट्रक भरधाव वेगाने आला. व त्या महिलेस धडक दिली त्यात ती महिला ट्रकच्या टायरखाली आली  महिलेच्या डोक्यावरून टायर गेल्याने त्या महिलेचे डोक्याचा  चेंदामेंदा होऊन तिचा जागीच मृत्यू झाला. ट्रक चालकाने हे दृश्य पाहून तिथून पळ काढत तो फरार झाला. मयत महिला लातूर येथील एसटी महामंडळाच्या कार्यालयात वरिष्ठ लिपीक म्हणून कार्यरत होती.
सध्या ती महिला कोळगाव येथे वडील दगडू शेख यांच्याकडे राहत होती. सकाळी ड्युटीला जाण्यासाठी ही महिला पिंपळफाटा येथे आली होती. या घटनेची माहिती मिळताच रेणापूर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून ट्रक ताब्यात घेऊन मयत महिलेचे प्रेत रेणापुर ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यासाठी नेण्यात आले. याबाबत आमीन अहमद शेख वय ४९ वर्ष व्यवसाय ऑटो चालक रा.कोळगाव ता रेणापुर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून रेणापूर पोलिस ठाण्यात  एपी  ३९ टी ३७८६ या ट्रकच्या चालकावर गुन्हा नोंद करण्यात आला असून अधिक तपास रेणापूर पोलीस करीत आहेत. प्रत्यक्ष घटनासथळी असणा-या महिला व पुरुषास हा अपघात पाहिल्यानंतर अक्षरश: चक्कर आली. एका मुलीला तर रुग्णालयात दाखल करण्याची वेळ आली. त्यामुळे  अपघाताची भीषणता लक्षात येईल.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR