ट्रम्प टॅरिफला भारताचा हादरा; २७ युरोपीय देशांशी ट्रेड डील

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
अमेरिकेच्या टॅरिफनंतर भारताने चीन आणि रशियात आपली निर्यात वाढवल्यामुळे भारताची चीन आणि रशियासोबत जवळीक वाढत आहे, हाच आता अमेरिकेसाठी डोकेदुखीचा विषय बनला आहे. दरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांचा जळफळाट होण्याचे आणखी एक महत्त्वाचं कारण म्हणजे भारत आणि अमेरिकेत मोठी ट्रेड डिल होणार होती, मात्र सध्या तरी तीचा वेग मंदावल्याचे पहायला मिळत आहे, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्रम्प यांना फोन केला नाही, म्हणून ट्रेड डिल होऊ शकली नाही असा आरोप देखील अमेरिकेकडून करण्यात आला आहे.

दुसरीकडे भारत आणि युरोपीयन संघ जगातील सर्वात मोठी व्यापारी डील करण्याच्या खूप जवळ पोहोचले आहेत. युरोपीय संघात सध्या स्थितीमध्ये एकूण २७ देश आहेत. फोर्ब्सच्या रिपोर्टनुसार भारताचे वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांची बु्रसेल्स येथे युरोपीयन यूनियनशी संबंधित महत्त्वाच्या नेत्यांसोबत एक बैठक पार पडली आहे. या बैठकीमध्ये युरोपीयन यूनियन सोबत भारत जी ट्रेड डिल करणार आहे, त्याचं अंतिम स्वरुप कसं असेल यावर चर्चा करण्यात आली आहे. फोर्ब्सच्या रिपोर्टनुसार आता ही डील अंतिम टप्प्यात आहे.

दरम्यान या हालचाली वाढण्याचे आणखी एक महत्त्वाचं कारण म्हणजे अमेरिकेनं सुरू केलेलं टॅरिफ वॉर असल्याचं देखील बोललं जात आहे. अमेरिकेनं अनेक देशांवर टॅरिफ लादला आहे, त्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठा दबाव पहायला मिळत आहे, त्यामुळे आता युरोपीयन युनियन देखील या ट्रेड डिलसाठी उत्सुक आहे, लवकरच भारत आणि युरोपीयन संघामध्ये जगातील सर्वात मोठी व्यापारी डील झाल्याचं पहायला मिळू शकतं, हा अमेरिकेसाठी मोठा धक्का असणार आहे.

ट्रेड डीलसाठी अखेर ट्रम्प
भारताच्या दौ-यावर येणार
अमेरिकेचे भारतातील राजदूत सर्जियो गोर यांनी दिलेल्या माहितीनुसार, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प लवकरच भारताचा दौरा करण्याची शक्यता आहे. ट्रम्प यांच्या या संभाव्य दौ-यामुळे संरक्षण, व्यापार आणि तंत्रज्ञान क्षेत्रात अनेक मोठे करार होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.अमेरिकेसोबतची ट्रेड डीलवरील चर्चा उद्यापासून पुन्हा सुरु होणार आहे. या पार्श्वभूमीवर गोर यांचे भारताला चुचकारण्यासाठी वक्तव्य आले असल्याचे आंतरराष्ट्रीय जाणकार सांगत आहेत. ट्रम्प यांच्या भारत दौ-यात ‘पॅक्स सिलिका’ आणि जागतिक सिलिकॉन पुरवठा साखळीवर विशेष भर दिला जाऊ शकतो. चीनवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी दोन्ही देश सेमीकंडक्टर आणि चिप निर्मिती क्षेत्रात एकत्र काम करण्यावर चर्चा करतील. तसेच, आशिया-पॅसिफिक क्षेत्रातील सुरक्षा आणि सामरिक भागीदारीवरही या दौ-यात शिक्कामोर्तब होऊ शकते.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Nanded|'नाना पटोले यांना गुरू मानतो'; पाद्यपूजनावर काँग्रेस कार्यकर्त्यांचे स्पष्टीकरण
06:36
Video thumbnail
Latur|लातूर LCB ची धडाकेबाज कारवाई; घरफोडी प्रकरणाचा मोठा खुलासा
01:06
Video thumbnail
Latur|वडवळमध्ये घाणीचं साम्राज्य; ग्रामस्थांचा संताप
01:39
Video thumbnail
Purna|५० वर्षांचा गौरवशाली प्रवास! पूर्ण्यात जवाहरलाल नेहरू इंग्लिश स्कूलचा सुवर्ण महोत्सव
01:48
Video thumbnail
Latur|हैदराबादपेक्षाही भव्य? लातुरात उभारला जाणार 'स्टॅच्यू ऑफ नॉलेज'
02:14
Video thumbnail
Latur|एकमत डिजिटलच्या बातमीचा परिणाम; लातूरची सिटी बस सेवा पुन्हा सुरू
03:24
Video thumbnail
Latur|साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप
02:14
Video thumbnail
Nanded|२०२६ मध्येही अशी अवस्था! गर्भवतीला खाटेवरून रुग्णालयात नेण्याची वेळ
02:13
Video thumbnail
Nanded|हद्दपार आरोपीची किनवटच्या रस्त्यांवर पोलिसांनी काढली धिंड!
00:28
Video thumbnail
Latur|धावत्या ई-बाईकला अचानक आग; दोन स्फोटांनी उडाली खळबळ!
00:31
Video thumbnail
Nanded|MPSC मध्ये प्रथम आलेला अधिकारी लाचप्रकरणात अटकेत; संपत्तीची चौकशी सुरू
02:19
Video thumbnail
Latur|लातूरची सिटी बस सेवा ५ दिवसांपासून बंद; प्रवाश्यांचे हाल
03:29
Video thumbnail
Latur|लातुरात अण्णाभाऊ साठे जयंती सामाजिक उपक्रमांनी गाजली
01:38
Video thumbnail
Latur|'आरक्षणावरून समाजात तेढ नको' – माजी मंत्री दिलीपरावजी देशमुख यांचे आवाहन
05:23
Video thumbnail
Nanded|संतप्त नागरिकांनी थेट नगरपंचायत कार्यालयातच टाकला कचरा!
01:59

Latest news