21.5 C
Latur
Monday, January 6, 2025
Homeलातूरठप्प झालेली राज्यातील सोयाबीन खरेदी पूर्ववत करा

ठप्प झालेली राज्यातील सोयाबीन खरेदी पूर्ववत करा

लातूर : प्रतिनिधी
लातूरसह राज्यातील सोयाबीन खरेदीसाठी उघडण्यात आलेल्या बहुतांश खरेदी केंद्रावर गेल्या दोन ते तीन आठवड्यांपासून बारदाण्याचा तुटवडा असल्याने सोयाबीन खरेदी पूर्णपणे ठप्प झाली आहे. त्यामुळे खरेदी केंद्रावर दररोज चकरा मारण्याची वेळ शेतकरी बांधवांवर आली आहे. या प्रश्नात सरकारने त्वरित हस्तक्षेप करुन सोयाबीन उत्पादक शेतकरी बांधवांना दिलासा द्यावा, अशी मागणी माजी आमदार धिरज विलासराव देशमुख यांनी केली.
खरेदी केंद्रावरील सोयाबीन खरेदी ठप्प झाल्याने माजी आमदार धिरज विलासराव देशमुख यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महाराष्ट्र राज्य कृषी व पणन महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक (पुणे) यांना पत्र पाठवून या विषयाकडे त्यांचे लक्ष वेधले. माजी आमदार धिरज विलासराव देशमुख म्हणाले, हमीभावाने सोयाबीन खरेदीसाठी लातूर जिल्ह्यात नाफेडच्या वतीने १६ हमीभाव केंद्र सुरु करण्यात आले आहेत तर महासंघाच्या ३५ केंद्रांना परवानगी देण्यात आली. मागील दीड महिन्यांपासून हमीभावाने सोयाबीन खरेदी करण्यात येत आहे. मात्र अचानक ५८० ग्रॅम ऐवजी ५३० ग्रॅम बारदाण्याचा शासनाने आग्रह केल्यामुळे बाजारात तुटवडा निर्माण झाल्याने खरेदी बंद झाली आहे. तसेच सोयाबीनसाठी शेतक-यांच्या उपलब्ध बारदाना वापरण्यास मनाई करुन नवीन बारदाना वापरणे आवश्यक केल्याने शेतक-यांमध्ये असंतोष पसरला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR