22.3 C
Latur
Sunday, September 8, 2024
Homeमहाराष्ट्रठाकरेंच्या पत्रकार परिषदेची चौकशी

ठाकरेंच्या पत्रकार परिषदेची चौकशी

निवडणूक आयोग अ‍ॅक्शन मोडमध्ये

मुंबई : प्रतिनिधी
मतदानाच्या दिवशी उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन भाजपा आणि निवडणूक आयोगावर काही गंभीर आरोप केले होते. ही पत्रकार परिषद आता चौकशीच्या फे-यात अडकली आहे. भाजपने केंद्रीय निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती. आता आयोग अ‍ॅक्शन मोडवर आले आहे. भाजपचे कारस्थान असून ज्या ठिकाणी महाविकास आघाडीला मते मिळण्याची शक्यता आहे, त्या ठिकाणी जाणूनबूजून मतदानाला वेळ लावला जात आहे, असा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला होता. या पत्रकार परिषदेची आता चौकशी होणार आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या अडचणीत वाढ होण्याची दाट शक्यता आहे.

भाजपच्या तक्रारीनंतर केंद्रीय निवडणूक आयोगाने राज्य निवडणूक आयोगाला पत्र लिहिले होते. या पत्रात राज्य निवडणूक आयोगाला नेमके त्यादिवशी पत्रकार परिषदेत काय झाले, याची माहिती मागवली होती. त्यानुसार राज्य निवडणूक आयोगाने तपासणी करून पत्रकार परिषदेचा संपूर्ण मसुदा इंग्रजीत भाषांतर करून केंद्रीय निवडणूक आयोगाकडे पाठवला आहे. आता केंद्रीय निवडणूक आयोग काय निर्णय घेणार, हे पाहणे महत्त्वाचे असणार आहे.

भाषांतर तपासणार
राज्य निवडणूक आयोगाने भाषांतर करून पाठवलेला पत्रकार परिषदेचा मसुदा केंद्रीय निवडणूक आयोग परत तपासून पाहणार आहे. पत्रकार परिषदेत काही वादग्रस्त आहे का, आचारसंहिता उल्लंघन झाले आहे का, या सगळ््याची तपासणी करून निवडणूक आयोग पुढील पाऊले उचलणार आहे, असे सांगण्यात आले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR