30.1 C
Latur
Sunday, July 6, 2025
Homeमहाराष्ट्रठाकरे बंधूंना पाहण्यासाठी मराठी माणूस एकवटला

ठाकरे बंधूंना पाहण्यासाठी मराठी माणूस एकवटला

डोम खचाखच, रस्त्यावरही गर्दी

मुंबई : प्रतिनिधी
ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याला याचि देही, याचि डोळा अनुभवण्यासाठी नागरिकांनी वरळी डोमबाहेर गर्दी केली . डोममधील आसनव्यवस्था पूर्ण भरलेली असतानाही त्यापेक्षा दुप्पट गर्दी डोमबाहेर झालेली पाहायला मिळाली. ज्यानंतर गेटबाहेर उभ्या असलेल्या नागरिकांनी गेट तोडून आतमध्ये प्रवेश मिळवला.

महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे तब्बल २० वर्षांनंतर एकत्र आले आहेत. या दोन्ही भावांनी एकत्र यावे, अशी इच्छा अनेक दिवसांपासून मराठी माणसाकडून व्यक्त करण्यात येत होती. पण विजयी मेळाव्यानिमित्त का असेना पण दोन्ही भाऊ एकत्र आले असल्याने त्यांचे हे एकत्र येणे याचि देही, याचि डोळा पाहण्यासाठी मराठी माणसाने वरळी डोमच्या बाहेर एकच गर्दी केली आहे

. वरळी डोम खचाखच भरलेला असतानाही या डोमच्याबाहेर तिन्ही गेटसमोर नागरिकांची गर्दी पाहायला मिळाली. पण अखेर उत्साही नागरिकांनी गेट तोडून डोममध्ये प्रवेश मिळवला. वरळी डोम येथे मराठी विजयी मेळावा होत आहे. या मेळाव्याच्या ठिकाणी तुफान गर्दी झाली आहे. राज आणि उद्धव ठाकरे यांना ऐकण्यासाठी राज्याच्या कानाकोप-यातून लोक आले आहेत.

वरळी डोमच्या प्रवेशद्वारावर जमलेले कार्यकर्ते आत घुसण्यासाठी अट्टाहास करताना पाहायला मिळाले. ज्यामुळे त्यांना आवरताना पोलिसांनाही नाकीनऊ आले. अनेक लोक त्यांच्याकडे असलेला पास दाखवताना पाहायला मिळाले. वरळी डोमच्या प्रवेशद्वारावर महिला आणि पुरुष कार्यकर्त्यांची मोठी गर्दी झाली.

नागरिकांनी आत जाण्यासाठी रेटा सुरू केल्यानंतर अखेर गेट उघडल्यानंतर लोक आत पळत सुटले. या मेळाव्यात स्टेजवर फक्त राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोघेच बसले तर, इतर सर्व मान्यवर स्टेजखाली पहिल्या ओळीत बसले. भाषणं फक्त ४ जणांची होणार तर रश्मी ठाकरे, शर्मिला ठाकरे, अमित ठाकरे आणि आदित्य ठाकरे हे देखील एकत्रच दिसले. ठाकरे कुटुंबीय व्यासपीठासमोर पहिल्या रांगेत बसले होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR