लातूर : प्रतिनिधी
खरीप हंगामात आधिच पिकांची दैना झाली. जे हाती आले ते आडत बाजारात विक्रीसाठी शेतकरी घेऊन येत आहेत. मात्र गुरूवारी लातूरचा आडत बाजार अचानाक बंद राहिला. त्यामुळे शेतमालाचा सौदा निघाला नाही. कांही शेतक-यांकडून डबल एस बारदाण्यात (प्लॉस्टीक) शेतमाल येत असल्यामुळे हमालांनी त्यास विरोध म्हणून आडत बाजार गुरूवारी बंद राहिला. या बंदमुळे लातूरच्या आडत बाजारात कोटयावधी रूपयांचे व्यवहार ठप्प राहिले. तसेच बाजार समितीच्या आवारात दिवसभर शातता राहिल्याने रस्ते निर्मुष्य होते.
जिल्हयातील इतर बाजार समित्यांच्या प्रमाणेच लातूर बाजार समितीतही सर्वच प्रकारच्या बारबादाण्यात शेतमालाची आवक होत आहे. प्लॅस्टीकच्या डबल एस पोत्यात कांही शेतक-यांकडून लातूरच्या आडत बाजार शेतमाल येत असल्याने लातूर बाजार समितीने पत्र काढून शेतक-यांना डबल एस बारदाण्यात शेतमाल अणू नये, असे आवाहन केले होते. मात्र कांही शेतक-यांकडून सदर बारदाण्यात शेतमाल येत आहे. बुधवारी लातूरच्या आडत बाजारात एका आडतीवर डबल एस बारदाण्यात शेतमाल विक्रीसाठी आला असता मुनिमाने सदर शेतमाल उतरून घेण्याच्या सुचना हमालांना केल्या. यावेळी हमाल व मुनिम यांच्यात शब्दीक चकमक झडल्याने गुरूवारी आडत बाजारात हमाल संघटनेने बंदचे आवाहन केले.
लातूरच्या आडत बाजारात गुरूवारी ना कोणतेही पत्र, ना मागणी नसताना आचनक बंदचे आवाहन झाल्याने त्याचा परिणाम सर्व घटकावर जाणवला. या बंदमुळे ग्रामीण भागातून शेतमाल विक्रीसाठी आलेल्या शेतक-यांचे नियोजन कोलमडले. हातावर पोट असणा-या कामगारांचेही नियोजन बिघडले. तसेच इतर घटकांच्याही कामावर परिणाम झाल्याचे दिसून आले. गुरूवारी शेतमालाचा सौदा न निघाल्याने रस्ते निर्मुष्य पाहयला मिळले.

