23.3 C
Latur
Tuesday, December 24, 2024
Homeलातूरडिघोळ देशमुख (तांडा) येथील पदाधिका-यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

डिघोळ देशमुख (तांडा) येथील पदाधिका-यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

रेणापूर : प्रतिनिधी
माजी मंत्री तथा सहकारमहर्षी दिलीपराव देशमुख, लातूर ग्रामीणचे आमदार धिरज विलासराव देशमुख यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून रेणापूर तालुक्यातील डिघोळ देशमुख (तांडा) येथील ग्रामपंचायत आणि विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या पदाधिका-यांसह अनेकांनी नुकताच काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला. या पदाधिका-यांनी विधानसभा निवडणुकीसाठी आमदार धिरज देशमुख यांच्यासाठी जोमाने प्रचार करणार असल्याचा शब्द  त्यांनी दिला आहे. या  पदाधिका-यांच्या पक्षप्रवेशामुळे या भागात काँग्रेसचे प्राबल्य वाढल्याचे दिसून येत आहे.  यावेळी रेणापूर तालुका काँग्रेसचे अध्यक्ष तथा लातूर जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष प्रमोद जाधव, गंगांिसह कदम, विलास सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन रवींद्र काळे, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक अनुप शेळके आदी उपस्थित होते.
यावेळी डिघोळ देशमुख येथील सोसायटीचे सदस्य देवीदास राठोड, ग्रामपंचायत सदस्य संजय राठोड, अंकुश जाधव, लहू राठोड, महेश राठोड, रमेश राठोड, मंगेश जाधव, कृष्णा राठोड, विनायक राठोड, संतोष जाधव, बंडू राठोड, अंकुश राठोड, राहुल जाधव, सोनेराव जाधव, रविकांत जाधव, किरण जाधव, पवन राठोड, राजेभाऊ राठोड, आनंद जाधव, दत्ता जाधव, रणजित चव्हाण, अमोल राठोड, बब्रुवान जाधव, अजय राठोड, गणेश राठोड, बाळू जाधव, आकाश राठोड, करण जाधव, बालू राठोड, बालाजी जाधव आदींनी काँग्रेस पक्षात प्रवेश  केला.  या पदाधिका-यांंचे स्वागत सहकारमहर्षी दिलीपराव देशमुख, महाराष्ट्र राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण तथा वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित विलासराव देशमुख, लातूर ग्रामीणचे आमदार धिरज विलासराव देशमुख यांनी स्वागत केले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR